23 September 2021 1:57 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Municipal Corporation Elections 2022 | मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांसाठी 3 सदस्यीय प्रभाग पद्धत संतापजनक | कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना फक्त ५० हजार रुपये भरपाई | केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती IPL 2021 | DC vs SRH | आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनराइज हैदराबाद सामना रंगणार Hybrid Flying Car | केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासमोर फ्लाइंग कारचे मॉडेल सादर राज्यपालांनी राज्याच्या हिताचा आणि ओबीसी समाजाच्या हिताचा निर्णय घेतला - फडणवीस उद्या सोमैय्यांचा पारनेर येथे 'आरोप पर्यटन दौरा' | कारखाना विक्री प्रकरणी सोमय्या पारनेरला जाणार Benefits of Fever | ताप येण्याचे शरीरासाठी असे '४' प्रकारचे फायदे - नक्की वाचा
x

मोत्याची शेती करा आणि कमवा बक्कळ पैसे | सरकारही देतं 50 टक्के सबसिडी

Pearl farming information

मुंबई, ३० जुलै | जर आपण भारताचा विचार केला तर शेतकरी अनेक प्रकारचे वेगळ्या प्रकारच्या पिकांची लागवड करून शेती करीत आहे. त्याला तंत्रज्ञानाची जोड देऊन उत्पन्नातही वाढ होत आहे. महाराष्ट्रात प्रमुख यांनी ऊस, कापूस, कांदा सारख्या नगदी पिकांची लागवड करून त्यांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. परंतु आता भारतातील शेतकरी बऱ्यापैकी मोत्याच्या शेतीकडे वळला आहे. या लेखात आपण मोत्यांची शेतीनक्की काय असते याबद्दल माहिती घेणार आहोत.

BhagyaVivah Marathi Matrimonial

मौक्तिक संवर्धन (मोत्यांची शेती) म्हणजे काय?
मोती हे एक नैसर्गिक रत्न आहे आणि ते मोलस्क नावाच्या शंबुकामध्‍ये (शिंपल्यामध्ये) तयार होते. भारतात आणि इतरत्र मोत्यांची मागणी वाढत असूनसुध्‍दा त्यांचा नैसर्गिक पुरवठा मात्र अतिवापरामुळे आणि प्रदूषणामुळे कमी होत चालला आहे. भारत घरगुती मागणी पूर्ण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून दरवर्षी मोठ्या प्रमाणात संस्करित मोत्यांची आयात करतो. सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फ्रेशवॉटर ऍग्रीकल्चर, भुवनेश्वर या संस्थेने साध्या गोड्या पाण्यातील शिंपल्यांपासून गोड्या पाण्यातील मोत्यांची शेती करण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. गोड्या पाण्यातील शिंपले देशातील गोड्या पाण्याच्या स्त्रोतात मुबलक प्रमाणात आढळतात.

निसर्गात, जेव्हां एखादा परकीय कण उदा. वाळूचा कण किंवा लहानसा कीटक चुकून शिंपल्यामध्ये घुसला आणि शिंपला त्यास बाहेर घालवू शकला नाही तर तो त्या कणाभोवती एक चमकदार आवरण तयार करतो. या आवरणाचे थरावर थर जमून मोती तयार होतो. याच साध्यासोप्या तत्त्वाचा वापर मोत्यांची शेती करतानाही करण्‍यात येतो.

मोत्यांची शेती आपल्याला अधिक उत्पन्न देऊ शकते. आता बऱ्याच प्रमाणात शेतकरी मोत्याच्या शेतीकडे वळत आहेत. ही शेती कमी मेहनतीत आणि कमी खर्चात अधिक नफा देऊ शकते. मोत्यांच्या शेतीचे प्रशिक्षण ओरिसाच्या सेंट्रल इन्स्टिट्युट ऑफ फ्रेशवॉटर ऍक्वाकल्चर, भुवनेश्वर ओरिसा येथे दिले जात होते. परंतु आता देशाच्या इतर राज्यातही या शेतीचे प्रशिक्षण दिले जाते. शेतकऱ्यांसाठी काम करणारी संस्था किसान हेल्पलाइन मोत्यांच्या शेतीचे प्रशिक्षण देत आहे. या शेतीसाठी चा योग्य काळ हा ऑक्टोबर ते डिसेंबरच्या दरम्यान असतो. साधारण दहा फूट रुंद आणि दहा फूट खोल मोठ्या आकाराच्या तलावात मोत्यांची शेती केली जाते.

मोती संवर्धनासाठी 0.4 ट्रॅक्टरच्या छोट्या तलावात 25000 शिंपल्यातून मोत्यांचे उत्पादन केले जाते. ही शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना शिंपले खरेदी करावे लागतात. यानंतर प्रत्येक शिंपल्यात छोटीशी शल्यक्रिया झाल्यानंतर त्यात चार ते सहा मी व्यास वाले डिझाईन बीड सारखे गणेश, बुद्ध, पुष्पा च्या आकाराच्या आकृत्या टाकल्या जातात व त्यानंतर शिंपले बंद केले जातात. या शिंपल्यांच्या नायलॉन बॅग मध्ये दहा दिवसांपर्यंत एंटीबायोटिक आणि प्राकृतिक चाऱ्यावर ठेवले जाते. दररोज त्याचे निरीक्षण केले जाते आणि मृत शिंपल्याना काढले जाते. त्या शिंपलेना तलाव टाकले जाते. त्यांना नायलॉनच्या बॅगेत ठेवून बांबू किंवा बॉटल च्या साह्याने लटकवले जाते. तलावाच्या एका मीटर आत सोडले जाते. प्रति हेक्‍टर 20 हजार ते 30 हजार सिपच्या दराने यांचे पालन केले जाते. शिंपल्याच्या आतील निघणारा पदार्थ बीडच्या चहूबाजूने लागत असतो.

जो शेवटी मोतीच रूप घेत असतो. साधारण आठ ते दहा महिन्यानंतर शिंपल्यांच्या बाहेर येत असते. एक शिंपल्याची किंमत वीस ते तीस रुपये आहे. बाजारात एक मी.मी ते वीस मी.मी मोतीचा दाम हा साधारण तीनशे रुपये ते पंधराशे रुपये असतो. सध्या डिझाईन मोतीना खूप मागणी असून त्यांना बाजारात खूप दर मिळत आहे. विशेष म्हणजे देशातील बाजारापेक्षा परदेशात मोत्यांची निर्यात मोठ्या प्रमाणात केला जाते. इतकेच काय शिंपल्यांनाही बाजारात मोठी मागणी असते.शिंपल्यांपासून सजावटीच्या वस्तू तयार केल्या जात असतात. शिंपल्यांपासून कन्नोज मध्ये परफ्यूम तेल काढले जाते.

कुठे घेऊ शकतात मोत्याच्या शेतीचे प्रशिक्षण?
दक्षिण भारत आणि बिहारमधील दरभंगाच्या ऑयस्टरची गुणवत्ता चांगली असली तरी त्याच्या प्रशिक्षणासाठी देशात बरीच संस्था आहेत. त्यांनी मध्य प्रदेशातील होशंगाबाद आणि मुंबई येथून मोत्याच्या शेतीचे प्रशिक्षण घेतले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Pearl farming information in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#SarkariYojana(90)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x