नवीन कोरोनापेक्षा घातक आहे मनातील भीती | काही माध्यमं भितीच पसरवत आहेत? - सविस्तर वृत्त
मुंबई, २४ डिसेंबर: युनायटेड किंगडममध्ये सापडलेल्या कोरोनाव्हायरसच्या नवीन प्रकारापासून होणार्या धोक्याची अद्याप खात्री पटली नसली तरी बेल्जियम, इटली, नेदरलँड्स आणि इतर बर्याच युरोपियन शेजारी राष्ट्रांनी केवळ सावधगिरी म्हणून ब्रिटनहून प्रवास करणे बंद केले आहे आणि त्यानंतर भारताने देखील खबरदारीचा उपाय म्हणून ब्रिटनमधील हवाईसेवा थांबवली आहे. यूकेमध्ये सापडलेल्या कोरोनाव्हायरसबद्दलची माहिती फारच मर्यादित प्रमाणात आहे आणि व्हायरसच्या या व्हायरसमुळे वेगाने संक्रमण होतंय का याबद्दल आरोग्य तज्ञ देखील कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचू शकलेले नाहीत. असं असताना देखील भारतातील काही प्रसार माध्यमं सामान्य लोकांच्या मनात पुन्हा जुनी भीती आणि गैरसमज निर्माण होतील असे वृत्त का प्रसिद्ध करत आहेत हे समजण्या पलीकडील आहे. लोकांनी सरकारच्या नियमावलीप्रमाणे काळजी घेणे यात काहीच गैर नाही. मात्र सामान्यांच्या मनातील ‘भीती’ ही व्हायरस पेक्षा अधिक घातक आहे. लोकांनीं खबरदारी बाळगावी, मात्र मनात भीती नसणं हे कोणत्याही लशी पेक्षा मोठं औषध आहे हे समजून घेणं गरजेचं आहे.
ऑक्सफोर्ड लसीच्या चाचण्यांचा भाग असलेले डॉ. विक्रम तलावळीकर यांनी इंडिया टुडेला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत सांगितले की, कोविडचा हा नवीन प्रकार जास्त धोकादायक नाही. लॉकडाउन संबधित प्राथमिक उपाय केल्यावर देखील तो रोखता येऊ शकतो. त्यामुळे विनाकारण भीती बाळगू नये असं तज्ज्ञ डॉक्टर देखील सांगत आहेत.
विशेष म्हणजे भारत सरकारने देखील याबद्दल सांगताना घाबरण्याची गरज नसल्याचं म्हटलं आहे. कोरोना व्हायरसमध्ये जे परिवर्तन होतय, त्यामुळे लस दिल्यानंतर प्रत्येकाच्या प्रतिसाद देण्यावर परिणाम होईल का? या प्रश्नावर शास्त्रज्ञांनी हे अशक्य असल्याचे उत्तर दिले. मानवी शरीराला व्हायरसची लागण झाल्यानंतर त्यामध्ये अनेक बदल होत असतात. हे अनपेक्षित नाहीय आणि त्यामुळे चिंता करण्याचीही आवश्यकता नाही असे शास्त्रज्ञ सांगतात. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं होतं.
बायोएनटेकचे सह-संस्थापक उगर साहिन यांनी सांगितले की, कोरोनाच्या लशीला वेगळ्याच पद्धतीने विकसित केले आहे. यामुळे कोरोना विषाणूच्या नव्या प्रकारावर मात करण्यासाठी सक्षम लस तयार करता येऊ शकते. या लशीमुळे निर्माण होणारी अॅण्टीबॉडी क्षमता विषाणूच्या नव्या प्रकाराशी दोन हात करू शकतो. आवश्यकता भासल्यास सहा आठवड्यात नवीन लस तयार करता येऊ शकते इतपर्यंत आत्मविश्वास दाखवला आहे.
News English Summary: While the threat posed by the new strain of coronavirus found in the United Kingdom has not yet been confirmed, Belgium, Italy, the Netherlands and many other European neighbors have stopped traveling from Britain only as a precaution, and India has since suspended flights to Britain as a precautionary measure. Information about the coronavirus found in the UK is very limited and even health experts have not been able to reach any conclusions as to whether the virus is causing rapid transmission. Even so, it is beyond comprehension why some media outlets in India are publishing news that will create old fears and misconceptions in the minds of the common man. There is nothing wrong with people taking care of themselves according to government regulations. But the ‘fear’ in the minds of the common people is more dangerous than the virus. People should be careful, but it is important to understand that fear is a bigger drug than any vaccine.
News English Title: New Covid strain is not danger says experts do not fall in Rumors news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News
- Government Job | महाराष्ट्र कृषी विभागात सरकारी नोकरीची संधी, कसा कराल अर्ज, जाणून घ्या सविस्तर - Marathi News
- Earn Money Through Social Media | सोशल मीडियाच्या माध्यमातून करता येईल भरभरून कमाई; जाणून घ्या फायद्याची गोष्ट