12 December 2024 12:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Amazon Sale | ॲमेझॉन सेलमधील Realme स्मार्टफोनचे दर पाहून हडबडून जाल; हजारो रुपयांनी स्वस्त झाले हे 3 स्मार्टफोन्स SIP Mutual Fund | गुंतवणुकीचा राजमार्ग; योग्य पद्धतीने गुंतवणूक करून 5 कोटींची संपत्ती तयार करता येईल, अशा पद्धतीने गुंतवा पैसे Maruti Suzuki Swift | या कारच्या खरेदीसाठी शो-रूम मध्ये गर्दी, 6.49 लाखांची बजेटमधील कार खरेदी करा, फीचर्स जाणून घ्या BHEL Share Price | मल्टिबॅगर BHEL सहित हे 4 शेअर्स 49 टक्क्यांपर्यंत परतावा देतील, टार्गेट नोट करा - NSE: BHEL Horoscope Today | नवीन वर्ष 'या' राशींसाठी असणार अत्यंत खास; शनीच्या साडेसातीपासून व्हाल कायमचे मुक्त Samvardhana Motherson Share Price | संवर्धना मदरसन सहित हे 4 शेअर्स 45% पर्यंत परतावा देतील, फायदा घ्या - NSE: MOTHERSON
x

Health First | कोरोनासाठी प्रतिबंधात्मक आयुर्वेदिक उपाय

Preventive, Ayurvedic remedies, Corona, health article

मुंबई, ११ ऑक्टोबर : सध्या सारे जग हे कोविड-१९ म्हणजेच कोरोना व्हायरसमुळे सुरु असलेल्या महामारीमुळे पीडित आहे. अशामध्येच आपल्या शरीराची नैसर्गिक रोगप्रतिकारक क्षमता आपणास स्वस्थ व निरोगी ठेवण्यासाठी महत्वाचे कार्य करते. या रोगामध्ये प्रतिबंध हाच सर्वोत्तम उपाय ठरतो. सध्या कोविड-१९ या रोगावर कुठलाही खात्रिशीर उपाय सापडलेला नाही. त्यामुळेच या रोगापासून वाचण्यासाठी आपल्या शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढविणारे उपाय करणे योग्य ठरेल.

आयुर्वेद हे आयुष्य व आरोग्याचे विज्ञान असल्याकारणाने ते नैसर्गिक साधनांच्या वापरावर अधिक भर देते. आयुर्वेद हे मुख्यत्वे औषधी गुणधर्म असलेल्या रोपांवर आधारित विज्ञान आहे. आयुर्वेदात दिलेल्या सरळ आणि सोप्या पद्धतीद्वारे आपण आपल्या शरीराची रोगप्रतिकारक क्षमता अजून मजबूत बनवू शकतो. भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने यासंदर्भातच श्वसन संस्थेचे आरोग्य चांगले राखण्यासाठी वैयक्तिक स्तरावर काळजी घेण्याकरिता काही उपाय सांगितले आहेत. सदरील उपाय हे आयुर्वेदातील साहित्य व संशोधनावर आधारित आहेत.

शरीराची नैसर्गिक संरक्षण प्रणाली वाढविण्यासाठी सामान्य उपाय:

  • दिवसभर फक्त गरम पाणी प्या.
  • दररोज किमान अर्धा तास योगासन, प्राणायाम आणि ध्यान करावे.
  • दररोजच्या जेवणात हळद, जिरे, धने आणि लसुनाचा वापर करावा.

रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी उपाय:

  • रोज सकाळी १० ग्रॅम च्यवनप्राश (१ चमचा) घ्यावा.
  • तुळशीची पाने, दालचिनी, काळे मिरे, सुंठ, तसेच मनुकांपासून बनविलेल्या हर्बल टीचा किंवा काढ्याचे दिवसातून किमान दोन वेळा सेवन करावे. चवीनुसार यामध्ये गुळ किंवा लिंबाच्या रसाचा वापर करू शकता.
  • अर्धा चमचा (छोट्या चमचाने) हळद १५० मिली गरम दुधात टाकून दिवसातून एक किंवा दोन वेळा घ्यावे.

खोकला किंवा घसा खवखवणे:

  • दिवसातून कमीत कमी एक वेळा पुदिन्याचे पाने किंवा ओवा टाकून पाण्याची वाफ घ्यावी.
  • खोकला किंवा घशात खवखवत असल्यास लवंगाच्या चुर्णामध्ये गुळ किंवा मध मिसळवून दिवसातून दोन ते तीन वेळा घ्यावे.
  • वरील लक्षणे कमी नाही झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

#महत्वाची_नोट: सदरील माहिती ही भारताच्या आयुष मंत्रालयाकडून नागरिकांच्या हितार्थ प्रसिद्ध करण्यात आलेली असून ते फक्त प्रतिबंधात्मक असून उपचार नाहीत

 

News English Summary: With the world gripped by the contagion of the novel coronavirus strain from China that has so far claimed at least 130 lives and infected 6,000 people across the world, India’s Ministry of traditional medicine or AYUSH (Ayurveda, Unani, Siddha, Homeopathy) on Wednesday issued an “advisory” advocating preventive treatment against the viral infection. The note was widely circulated via the official Press Information Bureau. The same advisory also lists a host of preventive steps according to the tenets of Homoeopathy and prescribes “Arsenicum album30” that could be taken as “prophylactic medicine against Coronavirus infections.” The Homoeopathy recommendation came after the AYUSH Ministry had a meeting on Tuesday with the Central Council for Research in Homoeopathy to discuss how Homoeopathy could be used to treat a coronavirus infection.

News English Title: Preventive Ayurvedic remedies for corona health article.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x