28 March 2023 7:53 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRCTC Railway Ticket | रेल्वेने तिकीट बुकिंगचे नियम बदलले, प्रवासापूर्वी हे लक्षात ठेवा अन्यथा तुम्हाला सीट मिळणार नाही Saving Account | एका व्यक्तीला बँक सेविंग अकाऊंटची मर्यादा किती आहे? हे नियम लक्षात ठेवा अन्यथा नुकसान Minimum Salary of EPF | तुमचा किमान पगार किती आहे? कारण पेन्शनची रक्कम वाढणार, नवा प्लॅन लक्षात ठेवा Business Idea | कधीही बंद न पडणाऱ्या या व्यवसायात उतराल तर मोठी कमाई कराल, सरकारी मदत सुद्धा मिळतेय Horoscope Today | 29 मार्च 2023 | 12 राशींमध्ये बुधवारचा दिवस कोणासाठी कसा असेल? पहा तुमचं बुधवारचं राशीभविष्य Balkrishna Industries Share Price | पैसाच पैसा! या शेअरने गुंतवणुकदारांना 41,664% परतावा देत करोडपती बनवलं, स्टॉक बद्दल जाणून घ्या Multibagger Stocks | मार्ग श्रीमंतीचा! या 11 शेअर्सनी फक्त 1 महिन्यात 164 टक्क्यांपर्यंत परतावा दिला, शेअर्सची किंमतही कमी
x

ICC T20 वर्ल्ड कप २०२०; आयसीसी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर

सिडनी : पुढच्या वर्षी २०२० मध्ये होणाऱ्या आयसीसी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक आज जाहीर करण्यात आले. इतिहासात पहिल्यांदाच पुरुष आणि महिला ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धा एकाच वर्षी वेगवेगळ्या पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार खेळलेल्या जाणार आहेत. महिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धा २१ फेब्रुवारीला सुरू होणार असून अंतिम सामना जागतिक महिला दिनी म्हणजेच ८ मार्च रोजी मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर खेळवला जाणार आहे.

दरम्यान, स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात यजमान ऑस्ट्रेलिया आणि भारतीय महिला संघ एकमेकांच्या समोर उभे ठाकणार आहेत. २१ फेब्रुवारीला सिडनी येथील क्रिकेट मैदानावर हा सामना रंगणार आहे. तसेच जागतिक क्रमवारीत अव्वल ८ संघ स्पर्धेसाठी थेट पात्र ठरले आहेत आणि तर उर्वरीत २ स्थानांसाठी पात्रता स्पर्धा होणार आहे. २०१९ च्या अखेरच्या टप्प्यात पात्रता फेरी पार पडणार आहे असे वृत्त आहे.

हॅशटॅग्स

#Indian Cricket Team(84)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x