4 May 2024 11:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, गुंतवणुकीची संधी सोडू नका PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार! कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस सुसाट वाढणार Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

निवडणूक आयोगाकडून लवकरच लोकसभेच्या तारखा जाहीर होणार?

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकांची तारीख अद्याप जरी अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली नाही. परंतु, भारतीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकापूर्व सर्व तयारी सुरु केली आहे आणि त्यामधून हे संकेत मिळत आहेत. देशातील सर्व राज्यसरकारांना २८ फेब्रुवारीपर्यंत सर्व प्रशासकीय तयारी आणि तसेच सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.

त्यालाच अनुसरून सर्व राज्यांतील मुख्य सचिवांना केंद्रीय निवडणूक आयोगाने लेखी पत्र पाठविले असून त्यात फेब्रुवारी महिन्यानंतर अधिकाऱ्यांच्या बदल्या करता नाहीत, असे नमूद केले आहे. त्याबरोबरच, केंदीय निवडणूक आयोगाने दुसरे अप्रत्यक्ष संकेत दिले आहेत की, मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यात येतील. त्यानुसार, मूळ निवडणुका एप्रिल-मे महिन्यात होतील, अशी शक्यता आहे.

प्रसार माध्यमांच्या वृत्तानुसार, केंद्रीय निवडणूक आयोगाने सुद्धा आगामी लोकसभा निवडणुकांसाठी जय्यत तयारी सुरु केली आहे. तसेच, देशभरातील सुरक्षा व्यवस्थेबाबत गृह मंत्रालयासोबत संपूर्ण आढावा घेतल्याचे वृत्त आहे. तसेच देशभरात निमलष्करी दलाची आवश्यकता पाहून नेमक्या किती टप्प्यात निवडणुका घेता येतील आणि कधी घ्यायच्या यासंदर्भात सखोल चर्चा सदर बैठकीत झाली. दरम्यान, पुढील महिन्यात म्हणजे फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात निवडणूक आयोगाची केंद्रीय गृहमंत्रालयासोबत अंतिम बैठक आयोजित करण्यात आल्याचे वृत्त आहे.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x