13 December 2024 2:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो Vedanta Share Price | मल्टिबॅगर वेदांता शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL Mutual Fund SIP | SIP चे 'हे' योग्य नियम पाळा आणि बंपर परतावा मिळवा, अशा पद्धतीने नियोजन करा फायदा होईल EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, आता EPF खात्यातील पैसे ATM वरून काढा, सहज शक्य होणार, नवे नियम IPO GMP | स्वस्त IPO येतोय रे, शेअर प्राईस बँड 35 रुपये, पहिल्याच दिवशी मालामाल करणार, GMP संकेत - GMP IPO Horoscope Today | काही वेळातच 'या' राशींना मिळणार आनंदाची बातमी; जीवनात नवीन संधी प्राप्त होतील तर, काहींना पैसा HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
x

५ राज्यांच्या निवडणूका जाहीर; ११ डिसेंबर रोजी मतमोजणी

नवी दिल्ली : मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ, मिझोराम या चार राज्यांमध्ये आजपासूनच आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. देशातील मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ, मिझोराम तसेच तेलंगाणा या ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा आज निवडणूक आयोगाने केली. मुख्य निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांनी दिल्लीत पत्रकार परिषदेत आयोजित करून प्रसार माध्यमांना ही माहिती दिली.

दरम्यान, मध्य प्रदेश आणि मिझोराम या दोन राज्यांमध्ये २८ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर राजस्थान आणि तेलंगणा या दोन राज्यांमध्ये ७ डिसेंबर रोजी मतदान होईल. तसेच छत्तीसगढमध्ये २ टप्प्यात निवडणूक होणार असून पहिल्या टप्प्यात १२ नोव्हेंबर रोजी तर दुसऱ्या टप्प्यात २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. या पाचही राज्यांतील निवडणुकांचा निकाल ११ डिसेंबर रोजी जाहीर केला जाईल. महत्वाचं म्हणजे या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅटचा सुद्धा वापर होणार आहे, असं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे.

निवडणुकीच वेळापत्रक जाहीर केलेल्या ५ राज्यांपैकी मध्य प्रदेश, राजस्थान तसेच छत्तीसगड या ३ राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे. मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये तर मागील १५ वर्षापासून भाजपचे सरकार आहे. सत्ता असलेल्या तीनही राज्यात परिस्थिती अनुकूल नसून इथे भाजपला प्रस्थापित सरकार विरोधातील लाटेचा मोठा सामना करावा लागणार आहे. २०१३ मध्ये केंद्रातल्या मनमोहन सिंग सरकार विरोधात नाराजी होती. त्यावेळी मोदी लाटेचीही सुरुवात झाली होती.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x