14 December 2024 8:31 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

Indian Population | पुढील वर्षापर्यंत चीनला मागे टाकून भारत सर्वाधिक लोकसंख्येचा देश बनेल - यूएन रिपोर्ट

Indian Population

Indian Population | भारत लवकरच आपला शेजारी चीनला मागे टाकून जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश बनू शकतो. संयुक्त राष्ट्रांच्या (यूएन) अहवालात याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. “2023 मध्ये सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशाच्या बाबतीत भारत चीनला मागे टाकू शकतो.

प्रदेशनिहाय विचार केल्यास २०२२ साली पूर्व व आग्नेय आशिया हा सर्वाधिक लोकसंख्येचा प्रदेश असून तेथील लोकसंख्या २.३ अब्ज आहे. जगातील २९% लोकसंख्या या भागात राहते. त्याचबरोबर मध्य आणि दक्षिण आशियात २.१ अब्ज लोक राहतात, जे जगाच्या एकूण लोकसंख्येच्या २६% इतके आहे.

लोकसंख्येच्या बाबतीत भारत टॉप असेल :
चीन आणि भारत हे या प्रदेशांतील सर्वाधिक लोकसंख्या असलेले देश आहेत. २०२२ साली या दोन्ही देशांची लोकसंख्या अनुक्रमे १.४२६ अब्ज-१.४१२ अब्ज इतकी आहे. 2023 मध्ये लोकसंख्येच्या बाबतीत भारत जगातील सर्वात मोठा देश बनेल, असं या अहवालात म्हटलं आहे. या अहवालानुसार, २०५० पर्यंत भारताची एकूण लोकसंख्या १.६६८ अब्ज असेल, तर चीनची लोकसंख्या या कालावधीपर्यंत १.३१७ अब्ज होईल.

या वर्षी जगाची लोकसंख्या ८ अब्जांपर्यंत पोहोचू शकते :
नोव्हेंबर २०२२च्या मध्यापर्यंत जगाची एकूण लोकसंख्या आठ अब्जांपर्यंत पोहोचू शकते, असे संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात म्हटले आहे. मात्र, १९५० नंतर जगातील लोकसंख्या सर्वात कमी वेगाने वाढत आहे, ही दिलासा देणारी बाब आहे. २०२० मध्ये हा दर एक टक्क्याच्या खाली आला. संयुक्त राष्ट्रसंघाच्या ताज्या अंदाजानुसार, २०३० पर्यंत जगाची लोकसंख्या ८.५ अब्जांपर्यंत पोहोचू शकते. 2050 पर्यंत ही संख्या 9.7 अब्जांपर्यंत पोहोचू शकते.

२,१०० सालापर्यंत लोकसंख्या अशी असेल :
२०८० च्या दशकात जगाची एकूण लोकसंख्या १०.४ अब्जांवर पोहोचेल आणि २१०० पर्यंत ती याच पातळीवर राहील, असा अंदाज संयुक्त राष्ट्रांनी व्यक्त केला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Indian Population can surpass China as worlds most populous country in 2023 says UN Report details 12 July 2022.

हॅशटॅग्स

#Indian Population(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x