28 April 2024 9:04 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या Sandur Manganese Share Price | अशी संधी सोडू नका! अवघ्या 1 महिन्यात या शेअरने 43% परतावा दिला, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 28 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Mazagon Dock Share Price | सरकारी कंपनीचा शेअर तुफान तेजीत, 2 वर्षांत दिला 685% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स फोकसमध्ये, कंपनीबाबत मोठी अपडेट, फायदा होणार? HUDCO Share Price | PSU शेअर खरेदीला गर्दी, 1 वर्षात 369% परतावा दिला, तर 1 दिवसात 15% परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील आणि टाटा मोटर्स शेअर्समध्ये येणार सुसाट तेजी, कंपनीने दिली फायद्याची अपडेट
x

हरियाणा मेवातच्या मुस्लिम समाजाने मोगलांच्या विरोधात लढा दिला होता, 'मिनी पाकिस्तान' ट्रेंड चालवणाऱ्या भाजप नेत्यांची उपमुख्यत्र्यांकडून पोलखोल

Haryana Mewati Muslims

Haryana Crisis | भाजपाची सत्ता असलेल्या हरयाणातील नूह जिल्ह्यात झालेल्या भीषण जातीय हिंसाचारानंतर आता सरकार आणि प्रशासन परिस्थिती हाताळण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. दरम्यान, हरयाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनी शांततेचे आवाहन करत मेव मुस्लिमांच्या इतिहासाची आठवण भाजपाला करून दिली आहे. ते म्हणाले की, मेवातच्या जनतेने भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला होता. हे लोक मोगलांच्या विरोधातही लढले. त्यांनी हे वक्तव्य अशा वेळी केले आहे, जेव्हा सोशल मीडियावर भाजपच्या नेत्यांनी हरयाणातील नूह जिल्ह्याला ‘मिनी पाकिस्तान’ म्हणून संबोधण्यास सुरुवात केली आहे.

दुष्यंत चौटाला पुढे म्हणाले की, भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी मेवात नेहमीच भारताच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आहे. या मुस्लिम समाजातील लोकांनी मोगलांच्या हल्ल्याशीही लढा दिला. त्यानंतर तेही स्वातंत्र्यलढ्यात सामील झाले. भूतकाळ असो किंवा स्वातंत्र्योत्तर काळ, मेवात नेहमीच भारताच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आहे. स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या मेवातमध्ये सोमवारी जे घडले ते दुर्दैवी आहे. या घटनांमागील लोकांची ओळख पटवून त्यांना कठोर शिक्षा व्हायला हवी. यावेळी उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनी हिंदू संघटनांच्या या हत्यारं घेऊन अचानक होणाऱ्या मिरवणुकांवर देखील प्रश्न उपस्थित केले आहेत.

हिंदू संघटनांची हत्यारं घेऊन मिरवणूक आणि अचानक मशिदीला आग

चौटाला म्हणाले की, रॅली काढणाऱ्या लोकांनी याची संपूर्ण माहिती प्रशासनाला दिली नव्हती. मिरवणुकीला अंदाजे किती लोक जमतील याचा अंदाज आला नव्हता. अपुऱ्या माहितीमुळे पुरेशी सुरक्षा व्यवस्था होऊ शकली नाही आणि अशी घटना घडली. या घटनेमागे राजकारणही असू शकते, असे ते म्हणाले. सोमवारी ब्रजमंडल यात्रेदरम्यान नूंहमध्ये हिंसाचार उसळला. यात होमगार्डचे दोन जवान आणि एका नागरिकाचा मृत्यू झाला. याशिवाय गुरुग्राममध्येही एका मशिदीला आग लावण्यात आली होती, ज्यात एकाचा मृत्यू झाला होता. फरिदाबाद शहरातही तणावाचे वातावरण होते.

केंद्रीय मंत्री राव इंद्रजीत यांनी देखील हिंदू संघटनांच्या हत्यार बाजीवर प्रश्न उपस्थित केला

यापूर्वी केंद्रीय मंत्री राव इंद्रजीत सिंह यांनीही उपमुख्यमंत्र्यांसमोर प्रश्न उपस्थित केले होते. यात्रेदरम्यान शस्त्रे आणि काठ्या बाळगण्याबाबतही त्यांनी चौकशी केली. शेवटी धार्मिक मिरवणुकीत शस्त्रं कोण घेऊन जातं? त्यांना शस्त्र घेऊन चालण्याची परवानगी कोणी दिली? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

तो राजकीय हेतू काय?

एका बाजूला हरियाणात आणि केंद्रात भाजपाची सत्ता आहे. मात्र शेतकरी आंदोलन आणि जातं समाजाचा रोष या कारणांमुळे भाजपाला हरयाणातील १० लोकसभा जागेवर पराभवाची भीती सतावत आहे. त्यामुळे येथे हिंदू-मुस्लिम मतांमध्ये ध्रुवीकरण घडवून राजकीय फायदा घेण्याचा भाजप नेत्यांचा प्रयत्न आहे असं राजकीय तज्ज्ञांनी म्हटले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाला ज्या राज्यांमध्ये अधिक राजकीय धोका आहे त्याच राज्यात असे एकाच पॅटर्नप्रमाणे दंगली घडत असल्याचं देखील राजकीय विश्लेषकांनी अधोरेखित केले आहे.

News Title : Haryana Mewati Muslims fought against Mughals also for freedom says Dushyant Chautala 02 August 2023.

हॅशटॅग्स

#Haryana Mewati Muslims(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x