4 December 2022 7:50 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Weekly Horoscope | 5 ते 11 डिसेंबर | 12 राशींसाठी कसा राहील आगामी आठवडा, नशिबाची साथ कोणाला? Lakshmi Narayan Raj Yog | लक्ष्मी नारायण राजयोग उजळणार या राशींच्या लोकांचे भाग्य, प्रत्येक कामात यश मिळेल, तुमची राशी? एक 'सोंगाड्या' आहे जो सकाळी भगवा आणि दुपारी हिरवा असतो, मनसेच्या गजानन काळेंचा धार्मिक टोला कोणाला? Fast Money Share | हा शेअर एकदिवसात 20 टक्के वाढतोय, स्टॉक वाढीचे कारण काय? हा स्टॉक खरेदी करणार? Mutual Fund Calculator | 5000 ची SIP बनवते करोडपती, SIP गुंतवणुकीचे फायदे वाचा, पैसे गुणाकार गणित समजून घ्या Numerology Horoscope | 04 डिसेंबर, अंकज्योतिष शास्त्रानुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल?, तुमच्या मूलांकावरून जाणून घ्या Horoscope Today | 04 डिसेंबर 2022 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

वसुंधरा राजे मोदी-शहांना जोरदार धक्का देणार | राजस्थान भाजपमध्ये मोठ्या राजकीय बंडाची तयारी? - सविस्तर वृत्त

BJP

जयपूर, ११ ऑगस्ट | राज्यस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे सध्या मोदी-शहा यांच्या विरोधात बंड करण्याच्या तयारीत असल्याचं वृत्त आहे. भाजपच्या दिल्लीश्वरांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना धक्का दिल्यानंतर आता वसुंधरा राजे यांचावर लक्ष केंद्रित करण्यापूर्वीच त्या सावध झाल्या आहेत.

वसुंधरा राजे समर्थकांनी राजस्थानमधील प्रत्येक जिल्ह्यात अध्यक्ष नेमण्यास सुरुवात केली आहे. याशिवाय युवा संघटना आणि महिला संघटनांची स्थापना केली जात आहे. भारतीय जनता पक्षात अशा प्रकारे वेगळा गट स्थापन करण्याचा प्रकार प्रथमच घडत आहे. दरम्यान याबाबत सविस्तर माहिती केंद्राकडे भाजपच्या दुसऱ्या गटाने पोहोचवली आहे. त्यानंतर दिल्लीतील भाजप वरिष्ठांनी चिंता व्यक्त केली आहे.

वास्तविक राज्यस्थानमध्ये जे घडत आहे त्याची योजनाच मुळात मोदी-शहांनी आखल्याचं राजकीय तज्ज्ञांचं मत आहे. एकीकडे राजस्थानमधील भाजपवर माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचं एकहाती वर्चस्व आहे आणि त्यांना दुसरा प्रतिस्पर्धी देखील नाही ही भाजप श्रेष्ठींची मोठी अडचण होती. तिकडे मोदी-शहांच्या नव्हे तर वसुंधरा राजेंचा शब्द अखेरचा समजला जातो हे भाजपमधील वास्तव असल्याने दिल्लीश्वरांच्या शब्दाला मान नव्हता.

काही महिन्यांपूर्वी मोदी-शहा यांना राजस्थानमध्ये केवळ भाजपचं सरकार नको होतं, तर त्यासोबत वसुंधरा राजेंना शह देऊन स्वतःकडे संपूर्ण राज्याची सूत्र घेण्याची योजना आखली होती. आजही माजी मुख्यमंत्री असलेल्या वसुंधरा राजे गप्प आहेत. राज्यात सध्या सुरू असलेल्या सुंदोपसुंदीवर वसुंधरा राजेंकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. विशेष म्हणजे भाजपा प्रदेश कार्यालयात बोलावलेल्या बैठकीत असो किंवा पक्षाच्या ऑनलाईन संवादात त्या फिरकतही नाहीत.

काही महिन्यांपूर्वी राजस्थान कॉंग्रेसमधील वाद चव्हाट्यावर आलेला असताना वसुंधरा राजे यांच्या शांत राहण्यानं भाजपामध्ये सगळंच सुरळीत सुरू आहे काय, असा प्रश्न उपस्थित होत होता. कारण काँग्रेस सरकारमध्ये तणाव शिगेला पोहोचलेला असतानाच केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत, भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष ओम माथुर, गुलाबचंद कटारिया यांच्यासह अनेक दिग्गज नेते गेहलोत सरकारवर हल्लाबोल करत होते. पण दुसऱ्याबाजूला वसुंधरा राजे या संपूर्ण प्रकरणापासून अंतर राखून होत्या आणि मोदी शहांचा डाव हाणून पाडण्यासाठी पडद्याड काँग्रेसला मदत करत असल्याचं म्हटलं गेलं.

साधारण वर्षभरापूर्वी नागौर लोकसभा मतदारसंघाचे खासदार हुनमान बेनीवाल यांनी राजेंवर गंभीर आरोप केले होते. बेनिवास यांनी सांगितले की, वसुंधराराजेंमुळेच गेहलोत सरकारची बुडणारी नौका पुन्हा तरंगू लागली आहे. बेनिवाल यांनी त्या आधीही वसुंधरा राजेंवर कोमतीही भीडभाड न ठेवता आरोप केले होते. बेनिवाल यांनी ट्विटरवर एका पाठोपाठ एक ट्विट करत भाजपच्या दिग्गज नेत्या राजस्थानमधील काँग्रेस सरकार वाचविण्यासाठी आमदारांना फोन करत असल्याचा आरोप केला होता.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Rajasthan BJP Vasundhara Raje will may give big loss to State BJP news updates.

हॅशटॅग्स

#NarendraModi(46)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x