Papaya Leaf Juice on Dengue | पपईच्या पानांचा रस 'डेंग्यू' रुग्णांसाठी फायदेशीर - नक्की वाचा
मुंबई, २७ सप्टेंबर | मुंबईसह देशभरात ‘डेंग्यू’ , स्वाईन फ्ल्यू अशा आजारांनी आपलं डोकं वर काढलं आहे. दिवसेंदिवस या आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. या सोबतीला यावर उपाय म्हणून विविध घरगुती उपाय सुचवणारे मॅसेजेसही सोशल मिडीयातून फिरत आहे. अशांपैकी एक म्हणून ‘पपईच्या पानांमुळे डेंग्यू (Papaya Leaf Juice on Dengue) आटोक्यात राहतो’. पण ही अफवा नसून त्यात तथ्य असल्याचे काही संशोधनातून समोर आले आहे. (हे ही वाचा – पपई खा आणि वजन घटवा)
How to use papaya leaves to fight dengue :
अफवा तर नाही ना?
सोशल मिडीयात फिरणार्या या मॅसेजमुळे अनेकदा लोकांना ही एक अफवा वाटते. पण वास्तवात पपईची पानं आरोग्यदायी असल्याचे सिद्ध झाले आहे. युनिव्हर्सिटी ऑफ़ फ्लोरिडाचे संधोधक डॉ. नॅम डॅंग यांच्यामते, पपईच्या पानांचा रस फायदेशीर आहे. या पानांमुळे कर्करोगाशी सक्षमतेने सामना करता येतो. तसेच शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत करतो. तसेच मलेरियाशी सामना करण्याची क्षमता यामध्ये आहे. श्रीलंकन फिजिशियन डॉ. सनथ यांच्यामते कोवळ्या पपईच्या पानांचा रस डेंग्यूवर फायदेशीर आहे. हा रिसर्च पेपर 2008 साली श्रीलंकन जर्नल ऑफ़ फॅमिली फिजिशीयन मध्ये प्रसिद्ध करण्यात आला होता.
कसा आहे पपई फायदेशीर ?
पपईच्या पानांमध्ये chymopapin आणि papain अशी महत्त्त्वपूर्ण एंजाईम्स आढळतात. डॉ. सनथ यांच्या मते, या पानांमुळे रक्त साखळून न राहता प्रवाही होते. तसेच रक्तातील प्लेट्स काऊंट वाढवतात व डेंग्यूमध्ये होणारे यकृताचे नुकसान टाळून त्याची कार्यक्षमता वाढवतात.
कसा घ्याल पपईचा रस ?
* पपईची कोवळी पानं खुडून घ्यावीत. त्याचे देठ काढून फक्त पानं स्वच्छ धुवून घ्यावीत.
* खलबत्ता किंवा मिक्सरमध्ये ही पानं वाटून त्याची पेस्ट करावी. यामिश्रणामध्ये पाणी, मीठ व साखर मिसळू नये.
* यानंतर आठ तासांच्या अंतराने हा रस दिवसातून दोनदा प्यावा.
How Papaya Leaf Juice Can Be Used To Treat Dengue And Malaria :
रसाचे प्रमाण:
* 5-12 वयोगटातील मुलांसाठी – 5मिली /दिवसातून दोनदा
* 10 वर्षांखालील मुलांसाठी – 2.5 मिली
* मध्यमावयीन लोकांसाठी – 10 मिली / दिवसातून दोनदा
कोणत्या टप्प्यावर रुग्णांनी हा रस प्यावा ?
तज्ज्ञ डॉक्टरांच्यासल्ल्यानुसार शक्य तितक्या लवकर हा रस घ्यावा. डेंग्यूची लक्षण आढळल्यास / निदान झाल्यास तुम्ही लगेचच हा रस प्यायला सुरवात करू शकता.या आजारामध्ये झपाट्याने प्लेट्स कमी होतात. त्यामुळे त्या 150000 पेक्षा कमी होण्याआधीच हा रस प्यायला सुरवात करावी. कारण या आजाराची गंभीरता वाढल्यास काही अवयव निकामी होण्याची शक्यता वाढते. मग अशावेळी उपाय फायदेशीर ठरत नाहीत.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.
News Title: Papaya leaf juice is beneficial on dengue.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा