12 December 2024 9:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

Local Train Viral Video | धावत्या ट्रेनच्या दरवाजावर तरुणाची स्टंटबाजी; काळजात धडकी भरवणारा व्हिडिओ व्हायरल

Local Train Viral Video

Local Train Viral Video | सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला संपूर्ण जगामध्ये कोणत्या गोष्टी घडत आहेत याचा वेळोवेळी आढावा मिळतो. दरम्यान तुम्ही आत्तापर्यंत तुमच्या सोशल हँडलवर अतरंगी सतरंगी व्हिडिओ अनेक वेळा पाहिले असतील.

काही कलाकार त्यांच्या कलाकृतींचे व्हिडिओ शूट करतात तर काहीजण ब्लॉगिंग, डान्स इतर माध्यमातून स्वतःला लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. परंतु काही असे सुद्धा व्यक्ती आहेत ज्यांना नेमक्या कोणत्या व्हिडिओ करायच्या हेच कळत नाही. अगदी जीवा विशेष आणि जीवावर बेतणाऱ्या व्हिडिओ आजची तरुणाई करताना पाहायला मिळते.

आज आम्ही तुम्हाला अशाच एका वायरल व्हिडिओ बद्दल सांगणार आहोत. ही व्हिडिओ एका तरुणाची आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तरुण मुंबईच्या कोणत्यातरी स्टेशनवर ही स्टंटबाजी करताना दिसतोय. तुम्ही जर हा व्हिडिओ पाहिला तर तुमच्या काळजात नक्कीच धस्स होईल.

काय आहे व्हिडिओमध्ये :
व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तरुण ट्रेन सुरू झाल्याबरोबर दरवाज्याला पकडतो मात्र तो फ्रेंचच्या आत नाही तर बाहेरच उभा असतो. ट्रेनच्या वेगानुसार दरवाजाला पकडून तो देखील बाहेरच्याच दिशेने म्हणजेच प्लॅटफॉर्मवरूनच चालू लागतो. नंतर ट्रेन अतिशय जलद वेगाने धावू लागते. त्यावेळी हात तरुण चक्क दरवाजाला पकडून आणि कमरेतून अर्धा वाकून आपले पाय सरळ करतो. सोबतच ट्रेनबरोबर भरदार वेगाने स्वतःचे पाय घसरत पुढे जातो आणि प्लॅटफॉर्म संपायच्या आत पटकन ट्रेनच्या आत उडी घेतो. हा संपूर्ण थरारक व्हिडिओ ट्रेनमधीलच एका व्यक्तीने रेकॉर्ड केला असावा.

 

View this post on Instagram

 

A post shared by @12345678_A1_R1 (@ranmzna3737)

ट्रेनमध्ये लटकून प्रवास करणे आणि अशी जीवघेणी स्टंटबाजी करणे आतापर्यंत अनेकांच्या जीवावर बेतली आहे. तरीसुद्धा आजची तरुणाई हे असले स्टंट करून स्वतःचे हात पाय मोडून घेते. या आधी देखील एका तरुणाने अशीच स्टंटबाजी करून स्वतःचा एक हात आणि एक पाय गमावला आहे. अशा पद्धतीच्या लाखो घटना घडल्या असून सुद्धा तरुणाई डोक्यात हवा गेल्यासारखी वागते.

तरुणाई संतापली :
या तरुणाचा हा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर भरपूर प्रमाणात वायरल होत आहे. सोबतच व्हिडिओला हजारोंच्या संख्येने पाहिलं जात आहे. बऱ्याच व्यक्तींनी व्हिडिओला कमेंट करत संताप व्यक्त केला आहे. हा व्हिडिओ ‘@ranmzna 3737’ या अकाउंट वर पोस्ट करण्यात आला असून एका युजरने कमेंट केली आहे की, “पुढील स्टेशन पोलीस स्टेशन असेल”, तर आणखीन एक म्हणतोय,”अशाने मोठे अपघात होतात”. अशा पद्धतीच्या बऱ्याच कमेंट्स या व्हिडिओला आल्या आहेत.

Latest Marathi News | Local Train Viral Video 17 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Local Train Viral Video(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x