22 April 2024 9:19 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 22 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 22 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gratuity Calculator | पगारदारांनो! जर तुम्ही 7 वर्षे नोकरी केली असेल तर किती लाख ग्रॅच्युइटी मिळेल? येथे जाणून घ्या Ration Card Rules | तुमचा डीलरही कमी रेशन देतो का? फक्त हे काम करा, 1 दिवसात लाईनवर येईल IRCTC Railway General Ticket | रेल्वे जनरल तिकिटाचे हे खास नियम लक्षात ठेवा, अन्यथा तिकीट असूनही मोठा दंड भरावा लागेल EPF Passbook | पगारदारांनो! तुमची बेसिक सॅलरी 10,000 रुपये, वय 30 वर्षे, निवृत्तीनंतर तुम्हाला किती लाख रुपये मिळतील पहा ATM Cash Withdrawal | एटीएममधून पैसे काढताना 'या' लाईटवर लक्ष ठेवा, अन्यथा खाते रिकामे होईल
x

शिंदे सर्व समर्थक आमदारांना निवडून आणणार? | प्रथम शिंदेच्या मतदारसंघातील आकडेवारी पहा, एकनाथ शिंदेंचा पराभव होण्याचे संकेत

CM Eknath Shinde

CM Ekanth Shinde | आमच्या लोकांना चिन्ह काय मिळणार वैगैरे चिंता सतावत होती. मी त्यांना म्हणालो आपण शिवसैनिक आहोत जिथे लाथ मारु तिथून पाणी काढू. ५० पैकी एकही आमदार पडू देणार नाही असं सांगितलं. भाजपाचे ११५ मिळून आम्ही २०० करणार. हा या सभागृहातला शब्द आहे,” असं शिंदे ४ जुलै रोजी सभागृहामध्ये दिलेल्या आपल्या भाषणादरम्यान म्हणाले होते. एकजरी आमदार पडला तरी गावी शेती करायला निघून जाईन असं म्हणाऱ्या शिंदेंच्या मतदारसंघाचा आढावा घेतल्यावर तेच पराभवाच्या छायेत असल्याचं आकडेवारीतून स्पष्ट होतंय.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मतदारसंघातील म्हणजे ठाण्यातील कोपरी-पाचपाखाडी विधानसभा क्षेत्रातील जमिनीवरील आढावा समजून घेतला आणि त्यानंतर निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरून एकूण मतांची आकडेवारी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यांची शिंदेंच्या कोपरी-पाचपाखाडी विधानसभा क्षेत्रातील जमिनीवरील वास्तवाशी जोडणी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. एकूण वास्तव आणि संपूर्ण आकडेवारी पाहिल्यास आगामी विधानसभा निवडणुकीत समर्थक ५० (शिवसेनेतील बंडखोर आणि अपक्ष) आमदारांना निवडून आणण्याची शिंदेनी केलेली राजकीय अतिशयोक्तीच म्हणावी लागेल. कारण समोर आलेल्या एकूण आकडेवारीतून आणि कोपरी-पाचपाखाडी विधानसभा क्षेत्रातील जमिनीवरील वास्तव पाहिल्यास एकनाथ शिंदे यांचं आगामी विधानसभा निवडणुकीत राजकीय पतन निश्चित असल्याचा निष्कर्ष समोर आला आहे. त्यासाठी नेमकं काय सत्य समजून घेण्यात आलं ते आपण खाली सविस्तर पाहूया.

प्रथम एकनाथ शिंदेंना विधानसभा निवडणुकीत (कोपरी-पाचपाखाडी) पडलेली एकूण मतं जाणून घेण्यात आली :
१. २०१४ मधील विधानसभेतील मतं (स्वबळावर निवडणूक – त्यामुळे शिवसेनेची खरी मतं समोर आली) – शिंदेंना एकूण मतं 100316
२. २०१४ मधील विधानसभेतील मतं (स्वबळावर निवडणूक – भाजपाचे उमेदवार संदीप लेले) – संदीप लेले यांना एकूण मतं 48447
३. काँग्रेस उमेदवाराला एकूण मतं होती 17873
४. मनसे उमेदवाराला एकूण मतं होती 8578
५. एनसीपी उमेदवाराला एकूण मतं 3710

Eknath Shinde 2014

आता २०१९ शिवसेना भाजपाची युती झाली आणि काँग्रेस-एनसीपीची आघाडी झाली :
१. २०१९ मधील निवडणूक युती असल्याने (शिवसेना+भाजप) एकनाथ शिंदेंना एकूण मतं – 113497
२. काँग्रेस (आघाडी) उमेदवाराला एकूण मतं मिळाली – 24197

पण २०१९ मधील विधानसभा निवडणुकीत निकालात शिंदेंसाठी नेमकी काय आकडेवारी अपेक्षित होती?
1. म्हणजे २०१४ मध्ये शिंदेंना मत पडली होती 100316 आणि भाजपा उमेदवाराला एकूण मतं होती 48447
2. म्हणजे युती झाल्याने शिंदेंना अपेक्षित मतं होती 100316 (शिवसेना २०१४) + 48447 (भाजप २०१४) = 1,48,763
3. पण शिंदेंना एकूण मतं पडली 113497 (भाजपची 35,266 मतं फिरलीच नाही)
4. म्हणजे एकूण 1,48,763 आणि नवं मतदारांची मतं मिळून शिंदेंना अंदाजे १,६०,००० मतं अपेक्षित होती. पण सेना-भाजप मिळून केवळ 113497 मतं मिळाली होती. म्हणजे एकनाथ शिंदेंच्या स्वयंघोषित बालेकिल्ल्यात ना भाजपच्या मतदारांनी मतं दिली, ना नवं मतदारांनी हे आकडेवारीतून सिद्ध होतंय.
5. म्हणजे मोदींमुळे भाजपची मतं आम्हाला मिळाली आणि सेनेचे उमेदवार निवडणूक आले हा एकनाथ शिंदेंचा दावा १०० टक्के खोटा आणि बोगस असल्याचं शिंदेंच्या स्वयंघोषित बालेकिल्ल्यातच म्हणजे कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातच सिद्ध होतंय.

तर २०१९ मधील विधानसभा निवडणुकीत निकालात आघाडीला नेमकी काय आकडेवारी अपेक्षित होती?
1. २०१४ मध्ये काँग्रेस आणि एनसीपीच्या उमेदवारांना अनुक्रमे 17873 आणि 3710 मतं पडली होती – एकूण बेरीज 21,583
2. म्हणजे आघाडी झाल्याने काँगेस उमेदवाराला अपेक्षित मतं होती 21,583. पण २०१९ मध्ये प्रत्यक्षात एकूण मत मिळाली 24197 (मत वाढली)

Eknath Shinde 2019

आकडेवारीनंतर आता त्यातील दुसरं वास्तव समजून घेऊया :
एकनाथ शिंदेंना किंवा शिवसेना उमेदवाराला भाजपचा मतदार मतदानच करत नाही हे येथे आकडेवारीतून सिद्ध होतं. भाजपचा मतदार आहे, पण तो युतीत शिवसेनेला मतदान करत नाही. कमीत कमी ठाण्यात तरी हे वास्तव समोर आलं आहे. विशेष करून एकनाथ शिंदे यांच्या कोपरी पाचपाखाडी या मतदारसंघात तर हेच वास्तव आहे. हा मतदार अमराठी (गुजराती, मारवाडी, जैन आणि ब्राह्मण समाज) असण्याची अधिक शक्यता आहे. युती झाल्यास भाजप उमेदवार नसल्याने तो मतदानाकडे पाठ फिरवतो. म्हणजे एकनाथ शिंदेंना मतदान करणारे उमेदवार हे शिवसेनेचे कट्टर पारंपरिक मतदार आहेत हे सिद्ध होतं.

आता वरती जे आकडे आहेत त्याचा संबंध ठाकरे आणि आनंद दिघे यांना मानणाऱ्या पारंपरिक मतदारांचा. म्हणजे जेव्हा एकनाथ शिंदे हे शिवसेनेसोबत म्हणजे स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या खऱ्या शिवसेनेसोबत आणि स्व. आनंद दिघेंच्या ठाण्यातील मराठी मतदारांसोबत असताना.

आता शिंदे यांनी शिवसेना फोडली आहे आणि त्यातून ठाणे आणि कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघात जमिनीवर या गोष्टी घडल्या आहेत :
1. एकनाथ शिंदे हे कितीही आव आणत असले तरी मूळ शिवसेनेसोबत नाहीत म्हणजे स्व. बाळासाहेब ठाकरे कुटुंबियांसोबत
2. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर संपूर्ण ठाणे तर सोडाच, फक्त एकनाथ शिंदेंच्या कोपरी पाचपाखाडी मतदारसंघात युवा सेनेने केलेल्या सदस्य नोंदणीत तब्बल १८ हजार तरुणांनी अधिकृत नोंदणी केली आहे. म्हणजे कोपरी पाचपाखाडी मतदारसंघात तरुण वर्ग पूर्णपणे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंच्या मागे उभा राहिला आहे.
3. काँग्रेस-राष्ट्र्वादीच्या उमेदवाराची पूर्वीची आकडेवारी पाहिल्यास आणि काँग्रेस-राष्ट्र्वादीने उमेदवार न दिल्यास एकनाथ शिंदे यांचा पराभव निश्चित मानला जाईल.
4. खरात गट आणि सुषमा अंधारे हे आंबेडकरी विचारातील लोकं आणि पक्ष शिवसेनेसोबत असल्याने शिंदेंच्या कोपरी पाचपाखाडीत अडचणी वाढणार.
5. राजाराम साळवी यांची आगरी सेना जो अनंत तरे यांना प्रचंड मानतो तो अशा अस्थित उद्धव ठाकरेंसोबत जाऊन एकनाथ शिंदेंचा पराभव निश्चित करेल असं स्थानिक पातळीवर गाठीभेटी केल्यावर समजलं.
6. ठाण्यातील शिंदेंच्या मतदारसंघात क्लष्टर योजनेचे तीन तेरा आधीच वाजले होते आणि त्यात शिंदेंच्या बंडखोरीमुळे किसन नगर आणि श्रीनगर भागातील मतदारांमध्ये एकनाथ शिंदेंविरोधात प्रचंड रोष असल्याचं समोर आलं आहे. त्याचे निवडणुकीत परिणाम दिसतील असे संकेत येथे मिळाले आहेत. थोडक्यात एकनाथ शिंदेंना २०१९ मध्ये मिळालेल्या एकूण मतांपैकी ८० टक्के मतं ही मूळ शिवसेनेची होती तर एकनाथ शिंदे यांची स्वतःची मतं केवळ २० टक्के आहेत हे देखील समोर आलं आहे.
7. प्रसार माध्यमांवर काहीही पुरस्कृत वृत्त पसरत असली तरी कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातील ही जमिनीवरील परिस्थिती पाहून शिंदे स्वतःला निवडून आणतील की याची खात्री नसताना ते राज्यातील सर्व ४० समर्थकांना निवडून आणणार असं समजणं म्हणजे राजकारण न कळणं असंच म्हणावं लागेल. त्यामुळे या आकडेवारीतून शिंदेंना साताऱ्यात शेती करायला इथला मतदारच पाठवेल असं चित्र आहे.

एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील शिवसैनिक :
ठाण्यात शिवसेना शाखेशी जोडलेल्या जमिनीवरील शिवसैनिकांची संख्या फारच कमी आहे हे अनेकांना माहिती नसलेलं मोठं वास्तव आहे, जे शिंदेंना सुद्धा ठाऊक आहे. ठाण्यात (कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघासहित) जमिनीवरील आढावा घेतल्यास असं लक्षात येईल की इथे शिवसेनेच्या शाखेत येणार आणि थेट समाजकार्यात असलेला कार्यकर्ता फार कमी आहे, ज्याचा थेट शिवसेना शाखेशी किंवा शिंदेंशी कामं असतं. इथला सामान्य शिवसैनिक कार्यकर्ता हा मोठ्या प्रमाणात नोकरदार वर्गातील असून तो स्व.बाळासाहेब ठाकरे, ठाकरे कुटुंबीय आणि स्व. आनंद दिघे यांना मानणारा आहे. या शिवसैनिकांचा एकनाथ शिंदे किंवा त्यांच्या खासदार पुत्राशी तसा कोणताही राजकीय संपर्क नाही. त्यांच्यासाठी शिवसेना म्हणजे फक्त आणि फक्त ठाकरे कुटुंबाला मानतो.

ठाण्यातील शिवसेनेचे स्थानिक कार्यकर्ते ते पदाधिकारी :
ठाण्यात पदाधिकाऱ्यांच्या फौज नाहीत म्हणजे जे पदाधिकारी आहेत ते शिंदेंच्या ठाण्यातील ‘कॉन्ट्रॅक्टर राज’ साठी जवळीक साधून आहेत. कारण शिंदे पिता-पुत्र ठाण्यात कार्यकतें आणि पदाधिकाऱ्यांना राजकीय दृष्ट्या कोणाला मोठं होऊच देत नाहीत. निवडणुकीच्या आयत्यावेळी अचानक आर्थिक बळावर इतर पक्षातील नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना पक्षात आणुन वेळ साधायची हाच त्यांचा नित्त्याचा कार्यक्रम ठाणेकरांनी पाहिला आहे. त्यामुळे हे पदाधिकारी त्याच्याशी मनातून जोडले गेलेले नसल्याने शिंदेच्या बंडानंतर ठाण्यात उत्साह नव्हता. राज्यभरात शिवसैनिक रस्त्यावर उतरल्याचे माध्यमांवर दिसल्यावर १-२ दिवसांनी ठाण्यात जवळच्या नरेश म्हस्के यांना आदेश देऊन एकमेव बॅनर लावून ठाण्यातील शिवसैनिक आपल्यासोबत असल्याचा केविलवाणा प्रकार केला होता. त्यानंतर शिंदेंचे ठाणे महानगपालिकेतील लाभार्थी नगरसेवक आणि लाभार्थी कॉन्ट्रॅक्टर कार्यरत झाले आणि लहान मोठे बॅनर्स झळकावले आणि माध्यमांना क्लिप पुरवल्या होत्या. शिंदेंचा डॉक्टर खासदार मुलगा तर अचानक गाडीचा टपावर उभं राहून उपस्थितांसमोर किंचाळत सेनेवर दावा ठोकताना जनतेने पाहिला होता.

बंडानंतर ठाण्यात शिवसैनिकांनी पाठ फिरवली होती :
शिंदेंच्या बंडानंतर सामान्य शिवसैनिकांनी पिता-पुत्राकडे पाठ फिरवली होती आणि जे लोकं आजूबाजूला दिसत होते ते सर्व ठाण्यातील शिंदेंचे आर्थिक लाभार्थी होते हे सर्वांना स्थानिक पातळीवर माहिती आहे. ठाण्याचा इतिहास असा आहे की येथे साधा नगरसेवक जरी शिवसेनेतून निवडून आला तरी ही जंगी मिरवणूक निघते, परंतु ठाण्यातून मुख्यमंत्री बनून आल्यावर देखील तो जोश दिसला नव्हता कारण सामान्य शिवसैनिक तेथे फिरकले सुद्धा नव्हते. अगदी ठाण्यातील तीन हात नाक्यावरील बॅनर्स सुद्धा पिता-पुत्राला स्वखर्चाने लावावे लागले होते स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना सुद्धा ठाऊक आहे. मात्र त्यातही राजकीय उतावळे कुटुंबीय बँजो-ड्रमसेट वाजवताना दिसले होते आणि त्यामुळे कौटुंबिक विचाराचा दर्जा महाराष्ट्राने उघड्या अनुभवला होता.

शिंदेंचं राजकारण आणि धर्मवीरांचं समाजकारण :
कार्यकर्ते पदाधिकारी आणि कार्यकर्ते सोडा, शिंदेंनी अगदी धर्मवीर आनंद दिघे यांच्या कुटुंबियांच्या बाबतीतही केलं आहे. दिघे कुटुंबातील कोणीही ठाण्याच्या शिवसेनेत राजकीय दृष्ट्या मोठं होणार नाही याची त्यांनी आनंद दिघेंच्या पश्चात कायम काळजी घेतली आहे. त्याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे शिंदेंनी बंड केल्यानंतर महाराष्ट्राला समजलं की ठाण्यात ज्यांनी शिवसेना वाढवली त्या धर्मवीर दिघेंचे कुटुंबीय कोण आणि त्यांची नावं काय आहेत. स्व. आनंद दिघेंचे कुटुंबीय किती सज्जन आणि सामान्य होते याचं उदाहरण म्हणजे त्यांनी कधीही त्यांच्या नावाचा वापर केला नाही आणि सामान्य बनूनच वावरतात. पण धर्मवीर आनंद दिघेंच्या नावाने कोणी मार्केटिंग करून स्वतःची पोळी भाजली असेल तर ते एकनाथ शिंदे असं इथल्या अनेक स्थानिक लोकांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरेंनी त्यांना मोठ्या विश्वासाने ठाण्यात खुली सूट दिली होती, पण त्यांनी त्याचा खूप गैरफायदा घेतल्याचं स्थानिक शिवसैनिक सांगतात.

स्व. आनंद दिघे यांना मानणारा ठाण्यातील कट्टर शिवसैनिक आणि पारंपरिक मतदार कधीच हे मान्य करू शकत नाही की, शिवसेना पक्ष फोडणाऱ्याला आनंद दिघे यांनी माफ केलं असतं. यासाठीच शिंदेंनी शिवसेना पक्ष फोडण्याआधी धर्मवीर सिनेमाची निर्मिती करताना सिनेमात (स्किप्टेड) स्वतःला नावानिशी हिरो बनवलं आणि आपण फुटणार आहोत हे माहिती असल्याने राज ठाकरेंना फिल्मी पद्धतीने त्यात अधोरेखित केलं. त्यामुळे सध्याच्या राज ठाकरेंच्या आणि शिंदेंच्या शिवतीर्थावरील स्किप्टेड भेटीतून तुम्हाला सिनेमा शिंदेनी लिहिला होता याचा अंदाज आलाच असेल.

ठाण्यातील दहिहंडी उत्सवात बरंच समोर आलं :
नुकत्याच पार पडलेल्या ठाण्यातील दहीहंडीत भाजप नेत्यांचे मोठे फ्लेक्स-बॅनर्स बरंच काही सांगून जात होतं आणि ते उपस्थितांना प्रचंड खटकलं होतं. म्हणजे एकनाथ शिंदे ठाण्याची शिवसेना पूर्णपणे भाजपाला देऊ पाहत आहे असा संदेश गेला आहे. शिंदेंनी ५० थराची हंडी बांधली खरी पण ती सुप्रीम कोर्टच्या सुनावणीत कधीही फुटेल आणि शिंदेनी रचलेला ५० चा राजकीय थर कधीही कोसळेल असं कायदेतज्ज्ञ सांगत आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: CM Eknath Shinde in danger zone in upcoming Assembly Election in Kopri Pachpakhadi assembly constituency 03 September 2022.

हॅशटॅग्स

#CM Eknath Shinde(90)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x