काम करताना किंचाळण्याची गरज नसते; मुख्यमंत्र्यांची पाठराखण करत विरोधकांना टोला
मुंबई, ७ एप्रिल: देशामध्ये महाराष्ट्रात करोनाचे सर्वाधिक रुग्ण असून कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकार आटोकाट प्रयत्न करत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या संकटाशी लढा देण्यासाठी अनेक तातडीची पावले उचलताना तितकेच कठोर निर्णयही घेतले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या याच नेतृत्वकौशल्याचे कौतुक करत आमदार रोहित पवार यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करणाऱ्यांचा समाचार घेतला आहे.
राज्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं निर्णय घेत काम करण्यास सुरूवात केली. वेळोवेळी घेण्यात आलेले निर्णय आणि राबवण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे उद्धव ठाकरे यांचं सर्व स्तरातून कौतुक होत असताना भाजपातील काही नेत्यांकडून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. विशेष म्हणजे विविध राज्यांचे मुख्यमंत्री तसेच विविध सेलिब्रिटींनीही मुख्यमंत्र्यांची तोंडभरून स्तुती केली आहे. या सर्वात भाजपचे काही नेते मात्र उद्धव यांच्या नेतृत्वावर सातत्याने टीका करत आहेत. या टीकेवर रोहित पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून सणसणीत टोला हाणला आहे.
‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कडक भूमिका घेत नसल्याचं काही लोक म्हणतात पण काम करताना किंचाळण्याची गरज नसते’, अशा शब्दांत रोहित यांनी कुणाचेही नाव न घेता टोला लगावला. ‘शांतपणे परिस्थिती कंट्रोल करता येत असेल. महाविकास आघाडीचे नेतेही खंबीर साथ देत असतील तर उगाच घसा फोडण्यापेक्षा शांत राहून कामाचा ठसा उमटलेला कधीही चांगला’, असेही रोहित यांनी सुनावले. रोहित यांच्या या ट्विटचा रोख कुणाकडे आहे, हे सर्वांनाच ठाऊक आहे.
मुख्यमंत्री @OfficeofUT साहेब कडक भूमिका घेत नसल्याचं काही लोक म्हणतात पण काम करताना किंचाळण्याची गरज नसते. शांतपणे परिस्थिती कंट्रोल करता येत असेल & त्यांना महाविकास आघाडीचे नेतेही खंबीर साथ देत असतील तर उगाच घसा फोडण्यापेक्षा शांत राहून कामाचा ठसा उमटलेला कधीही चांगला.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) April 7, 2020
News English Summary: Maharashtra has the highest number of coronary patients in the country and the state government is working hard to get control of it. Chief Minister Uddhav Thackeray has taken equally stringent decisions while taking many urgent steps to combat the crisis. Praising the leadership skills of the Chief Minister, MLA Rohit Pawar has taken the news of those who criticized Uddhav Thackeray.
News English Title: Story NCP MLA Rohit Pawar impressed with Chief Minister Uddhav Thackeray leadership slams opposition leaders Corona crisis News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News