16 December 2024 2:35 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | मल्टिबॅगर PSU एनएचपीसी शेअर रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

आयर्लंडचो पंतप्रधान आणि कोकणचो झील लिओ वराडकर; डॉक्टरच्या भूमिकेतून रुग्णसेवेत

Corona Crisis, Covid19, Ireland PM Leo Varadkar

डबलिन, ६ एप्रिल: सध्या जगभरात करोनामुळे मृत्यूंचे तांडव सुरु आहे. अमेरिका, इटली, स्पेन, ब्रिटेन आणि फ्रांस सारखे प्रगत देश देखी होरपळून निघाले आहेत. जगातील सर्वोत्तम आरोग्ययंत्रणा असताना देखील हे देश हतबल झाल्याचं पाहायला मिळत आहे. अमेरिकेत तर लाखाच्या घरात मृत्यू होण्याचा अंदाज सरकारी पातळीवरच व्यक्त केला आहे.

जगभरात सर्वत्र करोना व्हायरसनं थैमान घातलेलं असताना काही दिवसांपूर्वी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनाही करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. त्यांनी ट्विटर अकाउंटवरून आपली टेस्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती सर्वांना दिली होती. त्यानंतर ते होम आयसोलेशनमध्ये होते. परंतु आता त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

तर रशियात स्वतः राष्ट्राध्यक्ष पुतीन परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळत आहे. मॉस्कोतील रुग्णालयात स्वतः पुतीन यांनी पिवळ्या रंगाचा चमकदार फुल-बॉडी प्रोटेक्टिव सूट आणि श्वसन यंत्र घालून रुग्णांच्या अडचणी समजून घेताना दिसले आणि मी तुमच्यासोबत आहे असा संदेश देशवासियांना दिला.

आता आयर्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकर रुग्णांच्या सेवेसाठी पुन्हा एकदा डॉक्टरी पेशा स्वीकारणार आहेत. राजकारणात प्रवेश करण्याआधी वराडकर हे डॉक्टरी पेशाच्या माध्यमातून रुग्णसेवा करत होते. आयर्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकर यांनी पु्न्हा एकदा रुग्णसेवा करण्यासाठी आपली नोंदणी केली आहे. वराडकर यांच्या प्रवक्त्याने सांगितले की, पंतप्रधान वराडकर यांच्या कुटुंबीयातील सदस्य आणि मित्र आरोग्य क्षेत्रात काम करत आहेत. त्याशिवाय स्वत: पंतप्रधान करोनाच्या महासंकटात प्रत्यक्ष मदत करण्यासाठी उत्सुक असल्याचे सांगितले.

पंतप्रधान वराडकर हे आठवड्यातील काही दिवस रुग्णसेवेसाठी देणार आहेत. आयरिश टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, करोनाबाधित असलेल्या नागरिकांना फोनवरून समुपदेशन करण्याचे काम आरोग्य विभागाच्यावतीने देण्यात येण्याची शक्यता आहे. आयर्लंडमध्ये कोरोनाबाधित रुग्णांना फोनवरून मार्गदर्शन केले जाते.

आयर्लंडच्या आरोग्य मंत्रालयाने मागील आठवड्यात रुग्णालय कर्मचाऱ्यांची भरती मोठ्या प्रमाणावर सुरू केली आहे. रुग्णालये, आरोग्य केंद्रातील रिक्त जागांवर ही भरती करण्यात येत असून कर्मचाऱ्यांची कमतरता कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. आयर्लंडमध्ये करोनाबाधितांची संख्या पाच हजारांच्याजवळ पोहचली आहे. मागील वर्षी म्हणजे डिसेंबर २०१९ मध्ये त्यांनी त्यांच्या गावी म्हणजे मालवणला भेट दिली होती.

News English Summary: Corona crisis is on the rise worldwide. Many countries have taken precautionary measures to prevent the spread of coronary infections. A Prime Minister will land directly in the battle of Corona. Ireland’s Prime Minister Leo Varadkar will once again accept a medical profession to serve patients. Before entering politics, Varadkar served as a doctor through a medical profession.

 

News English Title: Story corona virus Covid19 in Ireland Prime Minister Leo Varadkar will treat corona infected patients News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x