14 November 2019 1:03 PM
अँप डाउनलोड

IND Vs AUS : पंत १५९ नाबाद, तर जाडेजा ८१ धावा, भारताचा पहिला डाव घोषित

सिडनी : कांगारूंविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामान्यांच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ करताना भारताने दमदार फलंदाजी करत पहिला डाव ७ बाद ६२२ भावांवर घोषित केला आहे. रिषभ पंत, चेतेश्वर पुजारा आणि रवींद्र जाडेजा यांच्या शानदार फलंदाजीमुळे भारताने ६०० धावांचा टप्पा ओलांडला आहे आणि कांगारुंपुढे मोठं लक्ष उभं केलं आहे.

त्याआधी चेतेश्वर पुजाराचं द्विशतक अवघ्या ७ धावांनी हुकलं. त्यांने उत्तर फलंदाजी करत ३७३ चेंडूंवर १९३ धावांची दमदार खेळी आहे. त्यामध्ये २२ चौकर ठोकण्यात आले. नंतर रिषभ पंतने त्याला चांगली साथ दिली आणि धावसंख्या अखेर पर्यंत धावती ठेवली. त्यादोघांमध्ये ६ व्या विकेटसाठी एकूण ८९ धावांची भागीदार झाली आणि भारतीय क्रिकेट टीम सुस्थितीत पोहोचली आहे.

हॅशटॅग्स

#Indian Cricket Team(60)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या