29 May 2022 4:19 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
x

हॉलिवूड अभिनेत्री मेरिल स्ट्रीप, 21वं ऑस्कर नामांकन

न्यूयॉर्क : हॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्री मेरील स्ट्रीप यांनी एक नवा विक्रम रचलाय. द पोस्ट या चित्रपटासाठी त्यांना ऑस्करचं नामांकन मिळालं. ‘द पोस्ट’ चित्रपटातील कॅथरिन ग्राहम या व्यक्तिरेखेसाठी यावर्षी मेरील यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचं नॉमिनेशन मिळालं आहे. एवढंच नाही, गोल्डन ग्लोब अवॉर्ड्ससाठी त्यांना ३१ वेळा नामांकन मिळालंय, ज्यापैकी ८ वेळा त्यांना हा पुरस्कार मिळाला. द पोस्ट या चित्रपटात वॉशिंग्टन पोस्टच्या माजी प्रकाशक कॅथरीन ग्रहॅम यांची भूमिका स्ट्रीप यांनी साकारलीये. 68 वर्षीय मेरिल स्ट्रीप यांच्या नावे गेल्या काही वर्षांपासून सर्वाधिक ऑस्कर नामांकन पटकवण्याचा विक्रम आहे.

सर्वोत्कृष्ट चित्रपट

डंकर्क

गेट आऊट

लेडी बर्ड

फँटम थ्रेड

कॉल मी बाय युअर नेम

डार्केस्ट आवर

द पोस्ट

द शेप ऑफ वॉटर

थ्री बिलबोर्ड आऊटसाईड एबिंग, मिझूरी

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन-

ग्रेटा गेरविग (लेडी बर्ड)

पॉल थॉमस अँडरसन (फँटम थ्रेड)

ख्रिस्तोफर नोलान (डंक्रिक)

जॉर्डन पीले (गेट आऊट)

गिलर्मो डेल टोरो (द शेप ऑफ वॉटर)

चार मार्चला २०१८ ला हा आॅस्कर सोहळा हॉलिवूड अँड हायलँड सेंटर येथील डॉल्बी थिएटरमध्ये रंगणार आहे.

हॅशटॅग्स

#Holloywood(2)#Meryl Streep(1)#Oscar(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x