पोर्ट एलिझाबेथ : दक्षिण आफ्रिकेत ६ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारतीय क्रिकेट टीम ने पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिकेत मालिका जिंकण्याचा पराक्रम केला आहे. सहा एकदिवसीय सामन्यांची मालिका ४-१ अशी सहज जिंकली. दक्षिण आफ्रिकेला २०१ धावांमध्ये गुंडाळून ५ वी वन-डे ७३ धावांनी जिंकली.

टीम इंडियाने विजयासाठी दक्षिण आफ्रिकेसमोर एकूण २७५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. एकट्या हाशिम अमलाने एक बाजूने खिंड लढवण्याचा अतोनात प्रयत्नं केला पण अखेर तो ७१ धावा करून धावचीत झाला, जो भारतीय टीमला निर्णायक क्षण ठरला. हार्दिक पंड्या आणि यजुवेंद्र चहलने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.

भारतीय टीमने ५० षटकांत ७ बाद २७४ धावांच लक्ष दक्षिण आफ्रिकेसमोर ठेवलं होता. त्यात रोहित शर्माने शतकी खेळी करत ११५ धावांची दमदार खेळी केली. रोहित शर्माचं हे वन-डे मधील सतरावं शतक होतं. या शतकात अकरा चौकार आणि चार शतकारांचा समावेश होता.

रोहितने शिखर धवन सोबत भारताला चांगली सुरुवात करून दिली. तर दुसऱ्या विकेट साठी विराट आणि रोहितने १०५ धावांची महत्वाची खेळी केली.

Team India vs South Africa port Elizabeth one day live