मुंबई : मराठवाडा आणि विदर्भातील अचानक झालेल्या गारपिटीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून, सत्ताधाऱ्यांनी त्यांना थेट मदत करण्याऐवजी त्यांच्यावरच ठिय्या आंदोलन करण्याची वेळ आली आहे.

विदर्भ आणि मराठवाड्यातील ११ जिल्ह्यांतील एकूण ५० तालुक्यांमधील १०८६ गावांतील एकूण १ लाख २४ हजार २९४ हेक्टर मधील सर्व पिके भुईसपाट झाली आहेत. त्या विषयाला अनुसरूनच शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी सामना संपादकीय मधून सरकारी सर्वेक्षण आणि पंचनामे सारख्या विषयात ना अडकता शेतकऱ्यांना थेट मदत कशी करता येईल यांचा विचार सरकारने करावा असे म्हटले आहे.

ज्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नसेल तर सर्व शिवसेना तालुकाध्यक्षांना शेतकऱ्यांसाठी तहसील कार्यालयांसमोर ठिय्या आंदोलन करण्याच्या सूचना सामना वृत्तपत्रातून देण्यात आल्या आहेत.

परंतु खेदाची बात म्हणजे जर सत्तेतील भागीदार असलेल्या शिवसेनेलाच जर सत्तेत असून मदत करण्याऐवजी थेट ठिय्या आंदोलनं करण्याची वेळ येणार असेल तर मग परिस्थिती फारच कठीण आहे असे शेतकरीच दबक्या आवाजात बोलत आहेत.

If Government will not help farmer from hailstorm then we will do movement said by Uddhav Thacakrey