26 May 2022 8:00 PM
अँप डाउनलोड

Rupali Chakankar Vs Chitra Wagh | महिला आयोगावर किमान रावणाला मदत करणारी शुर्पणखा बसवू नका - चित्रा वाघ

Rupali Chakankar Vs Chitra Wagh

मुंबई, १४ ऑक्टोबर | एनसीपी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकरयांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड जवळपास निश्चित झाली आहे. याबाबत आज म्हणजे गुरुवारी घोषणा होण्याची शक्यता आहे. मागील दीड वर्षांपासून हे पद रिक्त आहे. महिला अत्याचाराच्या घटना (Rupali Chakankar Vs Chitra Wagh) राज्यामध्ये वाढत असताना राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद रिक्त होते. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारवर विरोधकांकडून टीका होतं होती.

Rupali Chakankar Vs Chitra Wagh. It is a shameful that the state women’s commission does not have a chairman yet. The president should be appointed soon but if you are not getting any experience working in the field of women, at least don’t install ‘Shurpanakha’ to help Ravana said Chitra Wagh :

पती भष्टाचार अडकल्यावर चित्रा वाघ यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता आणि त्यानंतर रुपाली चाकणकर यांना राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश अध्यक्षपदाची संधी मिळाली होती. त्यानंतर त्यांनी राज्यभरात राष्ट्रवादीचे महिला संघटन मंजबूत करण्यासाठी मेहनत घेतली आहे. उच्च न्यायालयाने फेब्रुवारी २०२० मध्ये आयोगावर अध्यक्षाची नेमणूक करण्याची निर्देश दिले होते. तरी राज्य सरकारने गेले दीड वर्ष हे पद रिक्त ठेवले आहे.

दरम्यान याच संभाव्य नियुक्तीला अनुसरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी रुपाली चाकणकर यांचं नाव घेता टीका केली आहे. चित्रा वाघ यांनी ट्विटमध्ये म्हटलंय, ‘महिलांचे शील भ्रष्ट करणारे रावण राजरोस फिरताहेत पण राज्य महिला आयोगाला अद्याप अध्यक्ष नाही हे लाजीरवाणं आहे. अध्यक्ष लवकर नेमावा पण महिलांच्या क्षेत्रात काम करणारी कोणी अनुभवी मिळत नसेल तर किमान रावणाला मदत करणारी ‘शुर्पणखा’ बसवू नका.अन्यथा प्रत्येकवेळी सरकारचंच नाक कापलं जाईल”.

हे सुद्धा वाचा – Infosys Q2 Net Profit Rises | दुसऱ्या तिमाहीत इन्फोसिसच्या एकत्रित निव्वळ नफ्यात 12% वाढ

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Rupali Chakankar Vs Chitra Wagh after new women’s commission news.

हॅशटॅग्स

#ChitraWagh(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x