15 December 2024 10:31 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

Nattu Kaka Actor Ghanshyam Nayak Passes Away | तारक मेहता...फेम नट्टू काकांचं वृद्धापकाळाने निधन

Nattu Kaka Actor Ghanshyam Nayak Passes Away

मुंबई, ०३ ऑक्टोबर | तारक मेहता का उल्टा चष्मा या प्रसिद्ध टीव्ही सिरीअलमध्ये नट्टू काका ही भूमिका साकारणाऱ्या घनश्याम नायक यांचं आज निधन (Nattu Kaka Actor Ghanshyam Nayak Passes Away) झालं आहे. गेल्या काही महिन्यांपासून नट्टू काका म्हणजेच घनश्याम नायक कॅन्सरच्या आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर केमोथेरपी व इतर उपचार सुरु होते.

Nattu Kaka Actor Ghanshyam Nayak Passes Away. Veteran actor Ghanshyam Nayak, fondly known for playing the role of Nattu Kaka in Sony SAB’s ‘Taarak Mehta Ka Ooltah Chashmah’ is no more. The talented artist passed away on Sunday (October 3) in Mumbai. He was 77 :

आज (रविवारी) संध्याकाळी साडेपाच वाजल्याच्या दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. उपचारादरम्यान त्यांची तब्येत खराब झाल्यामुळे ते गेले काही दिवस तारक मेहताच्या सेटवर दिसले नव्हते, ते ७६ वर्षांचे होते. नट्टू काकांच्या निधनामुळे संपूर्ण मालिकेतील कलाकारांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

गुजराती थिएटर, अनेक चित्रपटांमधून घनश्याम नायक यांनी भूमिका केल्या आहेत. परंतू संपूर्ण देशभरात त्यांच्या नट्टू काका या भूमिकेला प्रेक्षकांनी सर्वाधिक पसंती दिली. आपल्या सहजसुंदर अभिनयामुळे ते भूमिकेत जान आणायचे.

नट्टू काकांच्या निधनाच्या बातमीवर सहकलाकारंनी शोक व्यक्त केला आहे. रोशन भाभी ची भूमिका साकारणारी अभिनेत्री जेनिफर मिस्त्रीनेही आपल्यासाठी ही अत्यंत दुःखद बातमी असल्याचं म्हटलंय. तारक मेहता मालिकेत त्यांच्या पुतण्याची भूमिका करणारा बागा म्हणेच तन्मय वेकेरियानेही आपला शोक व्यक्त केला. काही दिवसांपूर्वी त्यांनी पुन्हा सेटवर येऊन काम करण्याचा प्रयत्न केला होता पण त्यांची तब्येत सुधारत नव्हती. ते एखाद्या हिऱ्यासारखे होते. त्यांच्या जाण्याने मला अतीव दुःख झालंय.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Nattu Kaka Actor Ghanshyam Nayak Passes Away.

हॅशटॅग्स

#HindiSerial(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x