14 December 2024 3:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर Post Office Scheme | बंपर रिटर्न मिळवून देणाऱ्या पोस्टाच्या धमाकेदार योजना; जाणून घ्या आणि आजपासूनच बचत करा
x

भाजपच्या जाहिरातीतील शेतकरी सुद्धा आंदोलनात | बेकायदेशीरपणे वापरला फोटो

BJP Party, Punjab farmer Harpreet Singh, photo in advertisement

नवी दिल्ली, २३ डिसेंबर: केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांविरोधात सुरु असलेल्या आंदोलनाने चांगलाच जोर धरला आहे. पंजाब, हरियाणा तसेच इतर राज्यातील शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. परंतु, या शेतकऱ्यांनी आता आक्रमक पवित्रा धारण केल्याचं दिसतंय.

दरम्यान पंजाबमधील शेतकरी हरप्रीतसिंग हेही या आंदोलनात सहभागी झाले आहेत. पण पंजाबमध्ये या कायद्यांवर भाजपच्या जाहिरातीत हरप्रीतसिंग यांचा फोटो आहे. म्हणजेच भारतीय जनता पक्षाने ज्या शेतकऱ्याचा फोटो आपल्या जाहिरातीवर लावला आहे, तो गेल्या २ आठवड्यांपासून सिंघू सीमेवरील नवीन कृषी कायद्यांविरोधातील आंदोलनात बसला आहे. भारतीय जनता पक्षाने आपल्या फोटोचा बेकायदेशीररीत्या वापर केला आहे, असा आरोप हरप्रीतसिंग यांनी केला आहे.

हरप्रीत सिंग यांचा फोटो भारतीय जनता पक्षानं जाहिरातींमध्ये वापरला आहे. या जाहिरातीत नव्या कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांना फायदे होत असल्याचा दावा भारतीय जनता पक्षाकडून करण्यात आला आहे. परंतु भारतीय जनता पक्षानं आपला फोटो कोणत्याही परवानगीविना वापरला असल्याचा आक्षेप हरप्रीत यांनी नोंदवला. भारतीय जनता पक्षानं बेकायदेशीरपणे फोटो वापरल्याचा आरोप त्यांनी केला. हरप्रीत पंजाबच्या होशियारपूरचे रहिवासी असून ते शेतकरी आहेत. परंतु शेतीसोबतच ते अभिनयदेखील करतात.

 

News English Summary: Farmers protest is going on at the Singhu border against the farm laws of the central government. Harpreet Singh, a farmer from Punjab, has also joined the agitation. But in Punjab, there is a photo of Harpreet Singh in the BJP’s advertisement on these laws. In other words, the farmer whose photo the BJP has put on its advertisement has been protesting against the new agricultural laws on the Singhu border for the last two weeks. Harpreet Singh has alleged that the BJP has used his photo illegally.

News English Title: BJP Party uses Punjab farmer Harpreet Singh photo as its poster boy in advertisement who is protesting on Singhu border news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x