26 April 2024 2:45 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

आत्महत्येच्या प्रयत्नातून शेतकरी बचावला | म्हणाला बरेवाईट झाल्यास मोदी-शहांवर गुन्हे नोंदवा

Farmers protest, farmer Commit suicide, PM Narendra Modi, Amit Shah

नवी दिल्ली, २१ डिसेंबर: मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्यासाठी दिल्लीच्या सीमेवर आलेल्या एका शेतकऱ्याने काल पंजाबला गेल्यानंतर आत्महत्या केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा शेतकरी 2 दिवसांपूर्वीच दिल्लीतील आंदोलनातून परत पंजाबला आपल्या घरी आला होता. मृत 22 वर्षीय शेतकऱ्याचं नाव गुरलाभ सिंग असं आहे. तो बठिंडा जिल्ह्यातील दयालपुरा मिर्जा या गावातील रहिवासी होता. तो 18 डिसेंबरला आंदोलनावरुन परतला होता.

तरुण शेतकरी गुरलाभने शनिवारी (19 डिसेंबर) आपल्या घरी विषारी पदार्थ खाऊन आपली जीवनयात्रा संपवली. विष खाल्ल्यानंतर त्याला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. गुरलाभवर 6 लाख रुपयांचं कर्ज असल्याचंही सांगितलं जातंय. असं असलं तरी त्याच्या आत्महत्येचं निश्चित कारण अद्याप समजलेलं नाही.

त्यानंतर आज पंजाबमधील तरनतारन जिल्ह्यातील ६५ वर्षीय शेतकरी निरंजन सिंग यांनी सोमवारी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सिंघू सीमा कोंडली इथं आंदोलन करणार्‍या हजारो शेतकऱ्यांपैकी निरंजन सिंग हे एक आहेत. निरंजन यांनी विष प्राशन केल्यानंतर त्यांना प्रथम पानीपतच्या रुग्णालयात आणि त्यानंतर रोहतकमधील पीजीआय हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. तिथे त्यांची प्रकृती स्थिर आहे. (Niranjan Singh, a 65-year-old farmer from Tarn Taran district in Punjab, tried to commit suicide by consuming poison on Monday).

त्यानंतर त्यांनी व्यक्त होताना मोदी सरकारवर जोरदार टीका केली. ‘मला आता बरं वाटतंय. पण शेतकरी आत्महत्येसारख्या घटना घडतील तेव्हा कदाचित सरकार जागे होईल. एखादी व्यक्ती आत्महत्या करते तेव्हा त्याला प्रोत्साहित करणाऱ्या व्यक्तीविरोधात पोलीस गुन्हा दाखल करतात. माझ्या प्रकरणात पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा. शेतकरीच जगणार नसेल तर दुसरे कोणी कसे जिवंत राहतील?’, असं निरंजन सिंग म्हणाले.

 

News English Summary: Niranjan Singh, a 65-year-old farmer from Tarn Taran district in Punjab, tried to commit suicide by consuming poison on Monday. Niranjan Singh is one of the thousands of farmers protesting at Singhu Seema Kondli. After Niranjan ingested the poison, he was rushed to a hospital in Panipat and later to a PGI hospital in Rohtak. There his health is stable.

News English Title: Farmers protest farmer trying to commit suicide angry over PM Narendra Modi and Amit Shah news updates.

हॅशटॅग्स

#Farmer(119)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x