29 March 2024 3:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Power Share Price | अदानी पॉवर आणि रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मोठा करार, शेअरमध्ये मजबूत वाढीचे संकेत Skipper Share Price | अल्पावधीत 510 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन धावपळ, नेमकं कारण काय REC Share Price | 1 वर्षात REC शेअरने 292% परतावा दिला, आता एका सकारात्मक बातमीने शेअर्स खरेदीला गर्दी Reliance Share Price | खुशखबर! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर देईल 55 टक्केपर्यंत परतावा, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत Reliance Power Share Price | शेअरची किंमत 28 रुपये, अवघ्या 15 दिवसांत 40% परतावा देणारा स्टॉक लवकरच मल्टिबॅगर? IREDA Share Price | टेक्निकल चार्टवर IREDA स्टॉकची सपोर्ट लेव्हल तज्ज्ञांकडून जाहीर, स्टॉक पुढे घसरणार की तेजीत येणार? NHPC Share Price | टेक्निकल चार्टवर NHPC शेअर कोणते संकेत देतोय, सकारात्मक उपडेटनंतर तज्ज्ञांनी काय सल्ला दिला?
x

गोदी मीडिया शेतकऱ्यांविरोधात | सोशल मीडियावर २ दिवसात ११ लाख समर्थक जोडले

Kisan Ekta Morcha, social media Page, Modi government, Farmers Protest

नवी दिल्ली, २१ डिसेंबर: केंद्रातील मोदी सरकारनं घाईघाईत आणलेल्या कृषी कायद्यांचा शेतकरी संघटनांकडून विरोध सुरू आहे. या कायद्याविरोधात शेतकरी आंदोलनाचा आज २६ वा दिवस आहे. कडाक्याच्या थंडीत देखील शेतकऱ्यांची चिकाटी पाहून काही सरकार पुरस्कृत वाहिन्यांनी अर्थात गोदी मीडियाने शेतकरी आंदोलनाची बदनामी करण्यास सुरुवात केली होती आणि ती अजून सुरु आहे. त्यालाच प्रभावी उत्तर देण्यासाठी शेतकऱ्यांमधील काही तरुण पुढे आले आणि त्यांनी समाज माध्यमांचा प्रभावी उपयोग सुरु केला होता. मात्र त्यांना मिळत असलेला प्रतिसाद आणि उघडं पडत असलेल्या सरकारसाठी मुकेश अंबानींमार्फत भारतात राजकीय पाया भक्कम करणाऱ्या फेसबुकच्या पोटात दुखू लागलं.

रविवारी सायंकाळी अचानक फेसबुककडून ७ लाखांहून अधिक फॉलोअर्स असणारं ‘किसान एकता मोर्चा’चं पेज ब्लॉक करण्यात आलं. एका लाईव्ह व्हिडिओनंतर हे पेज ब्लॉक करण्यात आलं होतं. त्यामुळे ‘किसान एकता मोर्चा’च्या फेसबुक आणि इन्स्टाग्राम पेजवरून कोणतीही माहिती शेअर करता येत नव्हती.

या आंदोलनाची माहिती सोशल मीडियाद्वारे पोहचवण्याचा प्रयत्न करण्यासाठी तयार करण्यात आलेलं ‘किसान एकता मोर्चा’चं फेसबुक आणि इन्स्टाग्राम पेज अचानक ‘ब्लॉक’ करण्यात आलेलं दिसलं. यानंतर मात्र, सरकारकडून लादल्या जाणाऱ्या ऑनलाईन सेन्सॉरशीपबद्दलची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली. सोशल मीडियावर सरकारवर अनेकांनी टीकाही केली. त्यानंतर तीन तासांनी सदर पेज पुन्हा पूर्ववत करण्यात आलं. आता समाज माध्यमांवर १-२ दिवसात ११ लाखाहून अधिक समर्थन करणारे भारतीय जोडल्याने एकदा कोटिमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे भविष्यात भाजपाचे धाबे दणाणण्याची शक्यता आहे.

 

News English Summary: On Sunday evening, the page of ‘Kisan Ekta Morcha’ with more than 7 lakh followers was blocked by Facebook. This page was blocked after a live video. Therefore, no information could be shared from Kisan Ekta Morcha’s Facebook and Instagram pages. The Facebook and Instagram pages of Kisan Ekta Morcha, which was set up to spread information about the movement through social media, were suddenly blocked. After this, however, the discussion about the online censorship imposed by the government resumed.

News English Title: Kisan Ekta Morcha social media impact may affect Modi government news updates.

हॅशटॅग्स

#Farmer(119)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x