28 March 2023 1:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
TTML Share Price | टाटा ग्रूपच्या टीटीएमएल कंपनीचे शेअर्स कधी वाढणार? आतापर्यंत शेअरची कामगिरी कशी होती? सविस्तर माहिती EPF Interest Rate Hike | नोकरदारांसाठी खुशखबर! ईपीएफ व्याज दर वाढवले, आता किती फायदा मिळणार पहा Income Tax Cash Rules | बापरे! आता 2 लाख रुपयांपेक्षा जास्त रोख रकमेच्या खरेदीवर कागदपत्रे द्यावी लागणार VIDEO | भ्रष्टाचार दडविण्यासाठी लोकशाही ताब्यात घेण्याचा प्रयन्त, मोदींच्या मित्राने कायदाच बदलला, इस्रायली पंतप्रधांच्या अटकेसाठी जनता रस्त्यावर IRCTC Confirmed Train Ticket | तिकिटचे टेन्शन नाही! रेल्वेत बुकिंगवेळी कन्फर्म सीट मिळेल, बुकिंग करताना काय करावं पहा Tax Exemption Claim | तुमच्या पगारात DA, TA, HRA सह इतर अनेक भत्ते असतात, कशावर किती टॅक्स सूट मिळते पहा SBI FD Vs SBI Annuity Deposit Scheme | दर महिन्याला कमाईसाठी SBI ची कोणती योजना बेस्ट? दर महिन्याचा खर्च भागेल
x

कृषी कायदे मागे घेण्यास केंद्राचा नकार | शेतकरी तिन्ही कायदे रद्द करण्याच्या मागणीवर ठाम

Union home minister Amit Shah, farmers Protest, Meeting cancelled

नवी दिल्ली, ९ डिसेंबर: मागील काही दिवस शेतकरी मोदी सरकारच्या कृषी कायद्याविरोधात जोरदार आंदलोन करत आहेत. दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आणि गृहमंत्री अमित शहा (Union Home Minister Amit Sha and Farmers Leaders meeting on Farm Bills) यांच्यात सुरू असलेली बैठक समाप्त झाली असून, आधीच्या बैठकांप्रमाणेच ही बैठक देखील कोणत्याही तोडग्याविना संपल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे. मात्र केंद्र सरकार या कायद्यात सुधारणांबाबत शेतकऱ्यांना आज (९ डिसेंबर) लेखी प्रस्ताव देणार आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर शेतकरी नेते हनन मुला (Farmers Leader Hanan Mula) यांनी सांगितले की, केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घेण्यास नकार दिला आहे. कृषी कायद्यातील सुधारणांबाबत केंद्र सरकार आज आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना लिखित प्रस्ताव देणार आहेत. या प्रस्तावावर शेतकरी विचार करणार आहेत. दरम्यान, बुधवारी केंद्र सरकारसोबत होणारी बैठक होणार नसल्याचे देखील हनन मुला यांनी प्रसार माध्यमांना सांगितले आहे.

केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांसोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी रात्री घेतलेली बैठक निष्फळ ठरली आहे. त्यांनी १३ शेतकरी नेत्यांसोबत चर्चा केली. इंडियन कॉन्सिल ऑफ अँग्रिकल्चर रिसर्चच्या अतिथिगृहात ही बैठक झाली. अडीच तास चाललेल्या बैठकीत देखील समाधानकारक तोडगा निघाला नाही. शहा यांनी शेतकरी नेत्यांच्या शिष्टमंडळाला कायद्यात योग्य ते बदल करण्याबाबत लेखी देण्याबाबत आश्वासन दिले आहे. मात्र, शेतकरी नेते तिन्ही कायदे रद्द करण्याच्या मागणीवर ठाम राहिले. कायद्यात बदल करण्याचा शहा यांचा प्रस्तावही शेतकरी नेत्यांनी फेटाळला आहे.

 

News English Summary: In the last few days, farmers have been protesting against the Modi government’s agricultural laws. A meeting between representatives of agitating farmers on the Delhi border and Union Home Minister Amit Shah and Farmers Leaders’ Meeting on Farm Bills has come to an end. Meanwhile, in a meeting with farmers’ representatives, the central government has categorically refused to withdraw agricultural laws. However, the central government will give a written proposal to the farmers today (December 9) to amend the law.

News English Title: Union home minister Amit Shah talks with farmer leaders fail todays meeting cancelled News updates.

हॅशटॅग्स

#Amit Shah(262)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x