25 April 2024 12:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
My EPF Interest Money | पगारदारांनो! तुमचे EPF व्याजाचे पैसे अकाउंटमध्ये जमा झाले का? ​EPFO​ ने मोठी अपडेट दिली Bank FD Interest Rates | सुरक्षित भरघोस कमाई! 1 वर्षापर्यंतच्या FD वर मिळेल 8.5 टक्के परतावा, पाहा बँकांची यादी Smart Investment | दर महिन्याला करा रु.5000 ची गुंतवणूक, मुलांच्या उच्च शिक्षण आणि लग्नकार्यावेळी 57 लाख मिळतील Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची खास योजना, जेवढी गुंतवणूक कराल, त्याहून अधिक परतावा व्याजातून मिळेल 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! DA पासून HRA पर्यंत होणार मोठी सुधारणा, किती रक्कम वाढणार? Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 25 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Budh Rashi Parivartan | बुध ग्रह मार्गी होणार, या 3 राशींची लोकं ठरणार नशीबवान, तुमची राशी कोणती?
x

Health First | जाणून घ्या पौष्टीक अश्या बदामाचे गुणधर्म । नक्की वाचा

benefits of almonds

मुंबई ३० एप्रिल : घरात ड्रायफ्रुटमध्ये असणारा हमखास असणारा पदार्थ म्हणजे ‘बदाम’. तुम्ही काही विसरलात की, तुम्हाला बदाम खाण्याचा सल्ला अगदी हमखास दिला जातो. ‘’बदाम खा बदाम तुझ्या लक्षात राहील असे म्हणत दात विचकणारे लोक अनेक आहेत’’ पण ते म्हणत आहेत ते अगदी खरं आहे बरं का.. कारण बदाम खाण्याचे भरपूर फायदे (badam benefits in marathi) आहेत. एक बदामही तुमच्या आरोग्यासाठी लाभदायक ठरु शकते. इतकेच नाही जर तुम्हाला सुंदर आणि नितळ त्वचा हवी असेल तर मग तुम्ही बदाम अगदी हमखास खायला हवे. बदामाचे इतके फायदे पाहता आज आपण जाणून घेऊया बदामाविषयी सर्वकाही.

१. भिजवलेले बदाम सकाळी खाल्ले तर त्यात औषधी गुणधर्म जास्त असतात. कोरड्या बदामांपेक्षा पाण्यात भिजवून खाल्लेले बदाम हे जास्त पौष्टिक असतात.
२. बदामांच्या सेवनाने सर्दी आणि पडसे कमी होते. रात्री झोपतांना भिजवलेले बदाम आणि गरम दूध घेतले तर सर्दी कमी होते.
३. बदामाने काही काळ भूक भागवली जाते.
४. डाएटिंग करणारी लोक अधिक प्रमाणात बदाम खातात. डाएटिंग करणारे भूक लागल्यास इतर पदार्थांपेक्षा १२ बदाम खातात. हे बारा बदाम एका ब्रेकफास्टचे काम करते.
५. बदामामुळे पोषक द्रव्ये मिळतात आणि कॅलरीजही वाढत नाहीत.
६. मधुमेह झालेल्या व्यक्तींनी बदाम खाल्ल्यास त्यांची शुगर लेवल नियंत्रणात राहते.
७. बदामाची साल कोरडी असल्याने सहसा लोक ती काढून टाकतात. पण ही साल शरीरातील रक्त पातळी वाढवण्यास मदत करतात. म्हणून बदाम हे सालासकट खाल्ले पाहीजेत.
८. बदामामध्ये तांब्याचे प्रमाण जास्त असते. जे रक्त शुध्दीकरण करण्यास उपयुक्त ठरते.
९. बदामामुळे कोरडी त्वचा असणार्‍यांना त्वचेचा स्निग्धपणा वाढवण्यास मदत होते.
१०. बदामाच्या सेवनाने केस गळण्याचे प्रमाणही कमी होते.
११. तुम्ही अनेकांना हे बोलताना नक्कीच ऐकले असेल की, बुद्धी वाढवण्यासाठी बदाम खा. तुमच्या मेंदूला रिलॅक्स करण्याचे काम करते. त्यामुळे तुमची बुद्धी तल्लख राहते. तुम्हाला गोष्टी चांगली लक्षात राहतात. त्यामुळे लहान मुलांना बदाम खाण्याचा सल्ला दिला जातो.
१२. कॅन्सरशी दोन हात करण्याची ताकदही बदामामध्ये असते. बदामामधील अँटीऑक्सिडंट आजारांना दूर ठेवतात. त्यापैकीच एक मोठा आणि भयकंर आजार म्हणजे कॅन्सर..बदामाच्या नित्यसेवनामुळे तुम्ही कॅन्सरला दूर सारता.
१३.हृदयविकार असणाऱ्यांनी तर बदाम खायलाच हवे. तुमच्या आरोग्यासाठी बदाम हे उत्तम आहेत. तुमच्या शरीरासाठी अनावश्यक असलेले कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहिल्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता ही कमी होते.

News English Summary: Almonds are a specialty of dried fruits at home. Forget it, you are advised to eat almonds. “There are a lot of people who are gnashing their teeth saying you will remember almonds,” he said. An almond can also be beneficial for your health. Not only this, if you want beautiful and smooth skin then you should eat almonds.

News English Title: Almonds are beneficiary to our health news update article

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x