20 August 2022 10:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Viral Video | होमवर्क पासून सुटकेचा जबरदस्त उपाय, चिमुकल्याने सुरु केली टिचरची स्तुती, मजेदार व्हिडिओ व्हायरल NEFT Transactions Fee | बँकेच्या ब्रान्चमधून एनईएफटीचा वापर महागणार? आरबीआयचा 25 रुपये शुल्क आकारण्याचा प्रस्ताव SEBI Shares Sell Rule | शेअर्सच्या विक्रीसाठी 14 नोव्हेंबरपासून ब्लॉक यंत्रणा लागू होणार, जाणून घ्या कसं काम करणार Career Horoscope | 20 ऑगस्ट, करिअरच्या दृष्टीने 12 राशींच्या लोकांसाठी शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Ank Jyotish | 20 ऑगस्ट, शनिवारसाठी तुमचा लकी नंबर आणि शुभ रंग कोणता असेल, काय सांगतं अंकज्योतिष शास्त्र Horoscope Today | 20 ऑगस्ट 2022 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या MSSC Recruitment 2022 | महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात 7000 जागांसाठी मोठी भरती, ऑनलाईन अर्ज करा
x

अजब! स्वतःच राज्य सोडून गुवाहटीला पळाले | आता म्हणतात उद्धव ठाकरेंनी आम्हाला सोडलं

Gulabrao Patil

Gulabrao Patil | शिवसेनेने एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांना अपात्रता ठरवण्याची मागणी विधानसभा उपाध्यक्षांकडे केली आहे. विधानसभा उपाध्यक्षांनी या प्रकरणी नोटीसही बजावली आहे. या नोटिशीविरोधात शिंदे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. त्यावर सुप्रीम कोर्टात पुढील सुनावणी 11 जुलै रोजी आहे. तर, दुसरीकडे विधानसभा उपाध्यक्षांनी बजावलेल्याा नोटिशीविरोधात आपलं म्हणणं मांडण्यासाठी 12 जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. शिंदे गटाने दाखल केलेल्या याचिकेत अपात्रतेला आव्हान देण्यासह पक्ष विधीमंडळ गटनेता आणि प्रतोदाला मान्यता देण्याचा मुद्दा आहे. तत्पूर्वी दोन्ही बाजूने राजकीय टीकास्त्र सोडलं जातं आहे.

स्वतःच महाराष्ट्र सोडून गुवाहाटीला पळाले आणि… :
बंडखोर आमदारांची गुवाहाटीत बैठक झाली. यावेळी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात ही बैठक झाली असून बंडखोर आमदारांनी आपलं मत या बैठकीत मांडलं. यादरम्यान, शिवसेनेचे बंडखोर मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसेनेला टोला लगावत नाराजी व्यक्त केलीय. यावेळी त्यांनी शरद पवार यांचाही उल्लेख केला. गुलाबराव पाटील म्हणाले की, ‘त्यांनी वर्षा बंगला सोडला, त्यांनी आम्हाला 52 आमदारांनाही सोडलं, पण ते काही शरद पवारांना सोडायला तयारी नाहीत,’ अशा प्रकारची नाराजी गुलाबराव पाटील यांनी पहिल्यांदाच बोलून दाखवली आहे.

गुवाहाटीला पाळल्यावर राऊतांनी केली होती जहरी टीका :
यापूर्वी संजय राऊत यांनी बंडखोरांना घणाघात केला होता. ते म्हणाले होते की, ‘गुलाबराव पाटील आणि संदिपान भुमरे यांच्यावर टीका करताना पुढे ते म्हणाले, की गुलाबराव पाटील आणि संदिपान भुमरे यांच्यासारखे कातडे वाघाचे आणि काळीज उंदराचे असे आम्ही नाही. आमचे काळीजही वाघाचे आहे. गुलाबराव पाटील मोठमोठ्या बाता मारत होता, मी सच्चा शिवसैनिक आहे, मला कॅबिनेट मंत्री केले. मग आता का पळाला ढुंगणाला पाय लावून, असा हल्लाबोल त्यांनी केला. हे महाभारतातील संजयचे वक्तव्य आहे, ज्याने तीस वर्ष बाळासाहेबांच्या पायाशी बसून काम केले आहे. माझा शब्द कधी खोटा ठरत नाही, असे ते म्हणाले.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Gulabrao Patil political statement against Uddhav Thackeray check details 29 June 2022.

हॅशटॅग्स

#Gulabrao Patil(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x