13 December 2024 12:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

नागपूर अधिवेशन: शिवसेना आणि भाजपच्या दोन आमदारांमध्ये जोरदार हाणामारी

Shivsena, BJP

नागपूर: विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू असताना सभागृहात धक्कादायक प्रकार घडला आहे. शेतकरी प्रश्नावरून चर्चा सुरू असताना शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या आमदारांमध्ये थेट हाणामारी झाली आहे. शिवसेनेचे बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड आणि भारतीय जनता पक्षाचे आमदार अभिमन्यू पवार या दोघांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याचं पाहायला मिळालं.

सभागृहात दोन आमदारांमध्ये थेट हाणामारी झाल्याने मोठा गोंधळ उडाला. त्यानंतर सत्तारूढ पक्षाकडून जयंत पाटील आणि भास्कर जाधव आमदारांना समजावत आहेत. तर भाजपकडून आशिष शेलार आणि गिरीश महाजन हे भारतीय जनता पक्षाच्या आमदारांना आवरण्याचा प्रयत्न करत आहेत.

तत्पूर्वी, ‘समोरची लोकं आपल्याला पावलोपावली अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतील. पावलावर पाऊल टाकण्याऐवजी पायात पाय अडकवण्याची त्यांना सवय आहे.त्यामुळे सावध रहायला हवं’ असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. महाविकास आघाडीच्या बैठकीत ते बोलत होते. विधानभवनातील शिवसेनेच्या पक्ष कार्यालयात महाविकास आघाडीची बैठक पार पडली. यावेळी मुख्यमंत्र्यांसह शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे सर्व मंत्री आणि आमदार बैठकीला उपस्थित होते.

भारतीय जनता पक्षाने सामनातील बातमी दाखवत शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये देण्याची मागणी केली. महत्त्वाचं म्हणजे सभागृहातही भारतीय जनता पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला. यावेळी शिवसेनेचे आमदारही आक्रमक झाले. दोन्ही पक्षाचे आमदार इतके आक्रमक झाले की दोन आमदारांमध्ये चक्क हाणामारी झाली.

 

Web Title:  Shiv sena BJP MLAs Fight in Vidhan sabha During Winter session second day MLA Abhimanyu Pawar and MLA Sanjay Gaikwad Fight Each Other.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x