23 September 2021 2:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Municipal Corporation Elections 2022 | मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांसाठी 3 सदस्यीय प्रभाग पद्धत संतापजनक | कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना फक्त ५० हजार रुपये भरपाई | केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती IPL 2021 | DC vs SRH | आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनराइज हैदराबाद सामना रंगणार Hybrid Flying Car | केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासमोर फ्लाइंग कारचे मॉडेल सादर राज्यपालांनी राज्याच्या हिताचा आणि ओबीसी समाजाच्या हिताचा निर्णय घेतला - फडणवीस उद्या सोमैय्यांचा पारनेर येथे 'आरोप पर्यटन दौरा' | कारखाना विक्री प्रकरणी सोमय्या पारनेरला जाणार Benefits of Fever | ताप येण्याचे शरीरासाठी असे '४' प्रकारचे फायदे - नक्की वाचा
x

धनंजय मुंडे आणि त्यांच्या कुटुंबीयांचा घातपात करण्याचा डाव असल्याचा पोलिसांना संशय | सखोल चौकशी सुरु

Karuna Munde

बीड, ०६ सप्टेंबर | सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बेछूट आरोप करणाऱ्या करुणा मुंडे परळीत आल्या असता त्यांच्या गाडीत पोलिसांना पिस्तूल आढळून आले. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तूर्तास परळी पोलिसांनी करुणा यांना ताब्यात घेतले आहे. चौकशी चालू असल्याचे समजते आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

धनंजय मुंडे आणि त्यांच्या कुटुंबीयांचा घातपात करण्याचा डाव असल्याचा पोलिसांना संशय, सखोल चौकशी सुरु – A pistol was found in Karuna Munde’s vehicle at Parli in Beed district :

कोण आहेत करुणा मुंडे?
करुणा मुंडे यांची बहीण रेणू शर्मा हिने सर्वात अगोदर मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात धनंजय मुंडे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. तसंच रेणूने ट्विट करत तक्रारीची कॉपीपोस्ट केली होती. यावेळी रेणू शर्माने गंभीर आरोप केले होते. यानंतर करुणा आणि धनंजय मुंडे यांच्यामधील संबंध व प्रकरण समोर आले. याला धनंजय मुंडे यांनी फेसबुकवर पोस्ट करत पुष्टी दिली. तसंच त्यांचे कधीपासून सहसंबंध आहेत, या संदर्भात देखील खुलासा केला. यात करुणा यांच्यापासून धनंजय मुंडे यांना दोन आपत्य असल्याचे पहिल्यांदा धनंजय मुंडे यांनी फेसबुकवरून जाहीर केले होते.

काही दिवसानंतर रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेतल्यावर हे प्रकरण तीन चार महिने शांत झाले. यावेळी धनंजय मुंडे यांनी करुणा यांच्यासोबत घटस्फोट प्रकरण न्याय प्रविष्ट आहे. कोर्टामध्ये केस सुरू असल्याचे फेसबुकवरील पोस्टमध्ये नमूद केले होते. मात्र, सोशल मीडियाच्या माध्यमातून करुणा या संपत्तीपासून सामाजिक आणि राजकीय विषयावर कायम भाष्य करत होत्या. तसंच फेसबुक लाईव्ह करत होत्या. दोन दिवसांपूर्वी त्यांनी फेसबुक लाईव्ह करत ‘मी परळीमध्ये येणार आहे. तसंच पत्रकार परिषद घेऊन सर्व काही सांगणार आहे’, असं सांगितलं. यानंतर बीडच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.

धनंजय मुंडेंचा घातपात?
म्हटल्याप्रमाणे करुणा परळीत आल्या. यानंतर त्यांच्या गाडीत बेकायदेशीर पिस्तूल आढळला. त्यामुळे धनंजय मुंडे व त्यांच्या कुटुंबीयांचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

करुण मुंडेंच्या विरोधात शेकडो महिला रस्त्यावरतर:
परळी शहरातील शेकडो महिला रस्त्यावर उतरल्या आणि शहर पोलीस ठाण्यासमोर दाखल झाल्या आहेत. या महिलांनी करुणा यांनी धनंजय मुंडे यांची बदनामी तर केलीच, पण आज थेट धनंजय मुंडे यांना संपवण्यासाठी डाव आखला असल्याचा आरोप केला आहे. तसेच, करुणा शर्मा यांना अटक करण्याची जोरदार मागणी महिलांनी केली आहे. यावर आता परळी पोलीस काय भूमिका घेतात? हे पाहणे औत्सुक्याचे ठरले आहे.

‘करुणा मुंडेंपासून माझ्या जीवाला धोका आहे. ती नेहमी धनंजय मुंडेंना उध्वस्त करणार, संपावणार यासारखी भाषा वापरत आहे’, असे धनंजय मुंडे यांनी उच्च न्यायालयात तसेच फेसबुकवरील आपल्या खुलाशात देखील म्हटले होते.

वैद्यनाथ मंदिरात दर्शन घेणार, पत्रकार परिषद घेणार व त्यानंतर मुंडेंच्या घरी जाणार असे स्वतः करुणा यांनीच जाहीर केले होते. तेव्हा बेकायदेशीर रित्या बाळगलेले पिस्तूल घेऊन करुणा मुंडेंच्या घरी कोणत्या उद्देशाने निघाल्या होत्या? या सवालाने परळीत एकच खळबळ उडाली आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: A pistol was found in Karuna Munde’s vehicle at Parli in Beed district.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(266)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x