24 March 2023 5:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
ChatGPT Job Effect | चॅट जीपीटी'मुळे या क्षेत्रातील नोकऱ्यांना प्रचंड धोका, कोणत्या नोकऱ्या सुरक्षित? लिस्ट मध्ये तुमची नोकरी कोणती? Accenture Job Loss | आयटी क्षेत्रात भूकंप, दिग्गज कंपनी अ‍ॅक्सेन्चर 19,000 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार OnePlus Nord CE 3 Lite 5G | वनप्लसचा 108 MP कॅमेरा असलेला स्वस्त Nord CE 3 Lite 5G स्मार्टफोन लाँच होणार, किंमत-फीचर्स? Hindenburg Report on Block Inc | अदानींनंतर हिंडनबर्गचा बॉम्ब या उद्योगपती फुटला, शेअर्स 20 टक्क्यांनी कोसळले Numerology Horoscope | 24 मार्च, तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Deep Industries Share Price | या शेअरने 552 टक्के परतावा दिला, आता स्टॉक स्प्लिटची घोषणा, स्टॉक स्प्लिटचा फायदा घ्या Sera Investment Share Price | लॉटरीच लागली! गुंतवणुकदारांना 454 टक्के परतावा दिल्यानंतर आता हा शेअर स्प्लिट होतोय
x

लालबागचा राजाच नव्हे तर आता मतदारही सोमैयांच्या आरोपानंतर हसतात, बीएमसी निवडणुकीपूर्वी सोमैयांकडून नवे आरोप

Kirit Somiya

Kirit Somaiya | काही दिवसांपूर्वी लालबागच्या राजाचे दर्शन घेऊन झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, “नोएडातील भ्रष्टाचाराचे ट्विन टॉवर पाडले. आता महाराष्ट्रातील अनिल परब यांच्या भ्रष्टाचाराचे स्मारक असलेला त्यांचा रिसॉर्ट पाडण्याची शक्ती बाप्पाने द्यावी अशी प्रार्थना केली. मुंबई महानगरपालिकेतील माफिया सरकार जावे यासाठीही बाप्पाकडे प्रार्थना केली आणि बाप्पाही माझ्याकडे बघून हसले.

बीएमसी निवडणुकीपूर्वी नव्या राजकीय आरोपांचे लक्ष?
महाविकास आघाडी सरकार सत्तेवरून खाली आल्यानंतरही नेत्यांवर आरोपसत्र सुरूच आहे. ‘मुंबईतील महाकाली गुंफेमध्ये शिवसेनेचे नेते रवींद्र वायकर यांनी घोटाळा केला आहे. 500 कोटींचा हा घोटाळा आहे. महाकाली गुंफेसाठी 500 कोटी बिल्डरला दिले, असा गंभीर आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन रवींद्र वायकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. तसंच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरही घणाघाती टीका केली आहे.

उद्धव ठाकरेंचा उजवा हात संजय राऊत जेलमध्ये डावा हात अनिल परब रिसॉर्ट तुटणार आहे तर तिसरा हात वायकर घोटाळा केला आहेस अशी टीका सोमय्यांनी केली. वास्तविक अनिल परब हे शिवसेनेच्या शिंदे गटाविरोधातील कायदेशीर लढ्यात महत्वाची भूमिका बजावत आहेत. परिणामी त्यांचा फोकस तिथून कमी करण्यासाठी किरीट सोमैयांना पुन्हा अनिल परब यांना लक्ष करण्याचे आदेश दिले आहेत असं वृत्त आहे तर रवींद्र वायकर यांची त्यांच्या विधानसभा मतदारसंघात मजबूत पकड असून येथे भाजपाला महानगरपालिका निवडणुकीत फटका बसू शकतो म्हणून सोमैयांना पुन्हा नवे आदेश देण्यात आल्याचं सूत्रांकडून समजतं.

सोमय्यांनी आरोप केलेले हे नेते भाजपमध्ये किंवा भाजप सहकारी झाले आहेत :
१. नारायण राणे
२. यशवंत जाधव – शिंदे गट (ED चौकशी थांबली)
३. यामिनी जाधव – शिंदे गट (ED चौकशी थांबली)
४. भावना गवळी – शिंदे गट (ED चौकशी थांबली आणि मोदींना राखी सुद्धा बांधली)
५. प्रताप सरनाईक – शिंदे गट (ED चौकशी थांबली)

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: BJP leader Kirit Somaiya allegations on Shivsena MLA Ravindra Waikar check details 08 September 2022.

हॅशटॅग्स

#Kirit Somiya(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x