28 July 2021 7:11 PM
अँप डाउनलोड

पालघर, भाजपच्या प्रचार साहित्यांवर चिंतामण वनगांचे फोटो

पालघर : पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या निवडणूक प्रचार साहित्यावर सर्व ठिकाणी दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या फोटोचा तसेच नावाचा भाजपच्या उमेद्वाराकडून गैरवापर केला जात असल्याचा आरोप करत जयश्री वनगा यांनी भाजप विरोधात आचारसंहिता भंग केल्याची तक्रार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली असल्याचे वृत्त आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

भारतीय जनता पक्ष आणि त्यांचा उमेदवार केवळ मतांसाठी असले निंदनीय प्रकार करत असून आम्ही भाजप विरोधात आचारसंहिता भंग केल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे केल्याची माहिती जयश्री वनगांनी दिली आहे.

भारतीय जनता पक्ष किंव्हा त्यांच्या अधिकृत उमेदवाराने आम्हा वनगा कुटुंबीयांची कुठलीही लेखी परवानगी हे सर्व करण्यापूर्वी घेतलेली नसून भाजप केवळ मतांसाठी असले प्रकार करत असल्याचा आरोप वनगा कुटुंबीयांनी लेखी तक्रारीत केला आहे. त्यामुळे भाजपवर निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी कारवाई करावी अशी विनंती जयश्री वनगा यांनी तक्रारीत केली आहे. त्यामुळे निवडणूक अयोग्य आता या तक्रारीची काय दाखल घेणार आहे ते पाहावं लागेल.

हॅशटॅग्स

#Shivsena(1123)BJP(441)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x