15 December 2024 12:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

राज्यात कोरोनास्थिती बिघडत असल्याने कडक निर्बंध

Maharashtra, Covid 19, Stricken Rules

मुंबई, १५ मार्च: महाराष्ट्रातील कोरोना संसर्गाचा वेग दिवसेंदिवस काहीसा वाढताना दिसत आहे. दररोज मोठ्याप्रमाणावर करोना रूग्ण आढळून येत आहेत. तर, मृत्यूंच्या संख्येतही भर पडतच आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार निर्बंध अधिक कडक करण्याच्या तयारीत आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील तसा इशारा दिला आहे.

परिणामी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि सिनेमागृहांमध्ये केवळ क्षमतेच्या ५० टक्केच लोकांनाच परवानगी देण्यात आली आहे. तर राज्यात कोणत्याही राजकीय, सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रम घेण्यास बंदी घालण्यात आली आहे. राज्यात विवाह सोहळ्यांना गर्दी होत असल्याचं निदर्शनास आल्यानं पुन्हा एकदा उपस्थितांच्या संख्येवर मर्यादा घालण्यात आल्या आहेत. राज्यात आता विवाह सोहळ्यास फक्त ५० जणांना उपस्थित राहता येणार आहे. तर अंत्यसंस्कारासाठी केवळ २० जणांना उपस्थित राहता येणार आहे.

विशेष म्हणजे मुंबई आणि पुण्यासारख्या मोठ्या शहरातील कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. अशावेळी लोकांनी काळजी घेतली नाही तर लॉकडाऊनशिवाय पर्याय नसल्याचं लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांत या दोन्ही शहरात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्याने प्रशासनाकडून काही निर्बंधही लावण्यात आले आहेत.

 

News English Summary: The rate of corona infection in Maharashtra seems to be increasing day by day. A large number of corona patients are being found every day. So, the number of deaths is also increasing. Against this backdrop, the state government is preparing to tighten restrictions. Health Minister Rajesh Tope has also given such a warning.

News English Title: Maharashtra state corona situation getting negative day by day news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x