23 April 2024 8:53 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 24 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 24 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Communication Share Price | टाटा कम्युनिकेशन्स शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राईस जाहीर Waaree Renewables Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा शेअर! 6 महिन्यात 850% परतावा, तर 1 वर्षात 1250% परतावा दिला Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या कंपनीचा शेअर अप्पर सर्किट तोडतोय, वेळीच खरेदी करा Dynacons Share Price | कुबेर पावेल! हा शेअर खरेदी करा, 15 दिवसात दिला 83% परतावा, यापूर्वी 7657% परतावा दिला Voltas Share Price | टाटा तिथे नो घाटा! व्होल्टास शेअर्सची रेटिंग अपग्रेड, स्टॉक अल्पावधीत 38 टक्के परतावा देईल
x

Breaking | फायजरची लस घेतल्यानंतरही एका आठवड्यानंतर कोरोनाची बाधा

California nurse, tested corona positive, Pfizer Covid 19 vaccine

कॅलिफोर्निया, ३० डिसेंबर: भारतात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बहुप्रतीक्षित असलेल्या सीरमच्या लसीला भारतात लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. गेल्या महिन्यातच सीरम इन्स्टिट्युटने लसीच्या आपातकालीन वापराला परवानगी मिळावी म्हणून अर्ज केला होता. सीरमच्या या अर्जावर भारतीय औषध नियंत्रक यंत्रणेने नेमलेल्या विशेष तज्ज्ञ समितीची बैठक सुरु आहे. या बैठकीत सीरमच्या लसीला मान्यता देण्याचा निर्णय होऊ शकतो.

तत्पूर्वी बुधवारी ब्रिटीश सरकारकडून ऑक्सफर्ड आणि एस्ट्राझेन्का (Oxford/AstraZeneca) लसीच्या वापराला मान्यता देण्यात आली. त्यामुळे आता इंग्लंडमध्ये कोरोना रुग्णांसाठी मॉडर्ना पाठोपाठ आणखी एक लस उपलब्ध झाली आहे. त्यामुळे आता भारतातही ऑक्सफर्डच्या लशीला मान्यता मिळण्याची शक्यता वाढली आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाने तयार केलेल्या या लसीची सीरम इन्स्टिट्यूटकडून निर्मिती आणि वितरण केले जाणार आहे.

दुसरीकडे ब्रिटन, अमेरिका, युरोपीयन महासंघाच्या देशांमध्ये लसीकरण सुरू झाले असताना दुसरीकडे चिंता वाढवणारी एक बातमी समोर आली आहे. फायजरची लस घेतलेल्या एका पुरुष परिचारिकाला एका आठवड्यानंतर करोनाची बाधा झाली आहे. (California male nurse tested positive a week after receiving Pfizer Covid 19 vaccine)

राऊटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, मॅथ्यू डब्लू या पुरुष परिचारिकाने १८ डिसेंबर रोजी फायजरची लस टोचून घेतली होती. लस घेतल्यानंतर त्याला कोणतेही साइड इफेक्ट जाणवले नाहीत. लस टोचल्यानंतर सहा दिवसांनी नाताळाच्या पूर्वसंध्येला कोविड-१९ च्या युनिटमध्ये काम केल्यानंतर प्रकृती अस्वास्थाचा त्रास जाणवू लागला. मॅथ्यूला थंडी वाजू लागली आणि त्यानंतर अंगदुखीचा त्रास जाणवू लागला. त्याला थकवाही जाणवत होता. नाताळानंतर त्याने रुग्णालयात करोना चाचणी केली.

अमेरिकेचे संसर्गजन्य रोग तज्ज्ञ रेमर्स यांनी सांगितले की, करोनाविरोधात रोगप्रतिकार शक्ती निर्माण होण्यासाठी १० ते १४ दिवसांचा कालावधी लागू शकतो. करोना लशीचा पहिला डोस हा ५० टक्के सुरक्षा देतो आणि ९५ टक्के सुरक्षा मिळवण्यासाठी दुसऱ्या डोसची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

 

News English Summary: A male nurse who was vaccinated with Pfizer has contracted coronary heart disease a week later. According to Reuters, Matthew W, a male nurse, had injected Pfizer on December 18. He did not experience any side effects after taking the vaccine. Six days after the vaccination, on Christmas Eve, after working in the unit of Kovid-19, I started feeling unwell. Matthew began to feel cold and then began to suffer from body aches. He was feeling tired. After Christmas, he tested corona at the hospital.

News English Title: California male nurse tested positive a week after receiving Pfizer Covid 19 vaccine news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x