नवीन वर्षाचे स्वागत शांततेने व साधेपणाने साजरे करा...सरकारची विनंती
मुंबई, ३० डिसेंबर: कोरोनाचे संकट आवासून उभे आहे त्यामुळे येणाऱ्या नवीन वर्षाचे स्वागत शांततेने व साधेपणाने साजरे करा असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्यातील जनतेला केले आहे. नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी रात्री ११ पर्यंत हॉटेल, रेस्टॉरंट, पब, बार खुले राहणार आहेत. मात्र रात्री ११ नंतर हे सर्व बंद होणार आहे. याचा अर्थ घराबाहेर जावून औषधे, जेवण, मित्राकडे जाणे यावर बंधन नाही.
तसेच सार्वजनिक ठिकाणी पाचपेक्षा जास्त जणांनी एकत्र येण्यावर बंधने आहेत. जनतेने राज्यसरकारने दिलेल्या नियमावलीचे पालन करावे असे आवाहन करतानाच मोठ्या शहरातील जी हिलस्टेशन आहेत तिथेही हेच निर्बंध पाळण्याच्या सूचना त्या- त्या जिल्हापोलिस अधिक्षकांना दिल्या असल्याचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.
दरम्यान, रात्री 11 नंतर हॉटेल, पब्स, रेस्टॉरंट बंद राहणार आहेत. याचा अर्थ तुम्ही घराबाहेर पडू शकत नाही, असं नाही. तुम्हाला तुमच्या मित्रांकडे किंवा नातेवाईकांकडे जायचं असेल तर रात्री 11 नंतर जाऊ शकता. फक्त सार्वजनिक ठिकाणी 5 पेक्षा जास्त लोकांनी एकत्र जमू नये, असं त्यांनी सांगितलं. राज्य सरकारने दिलेल्या नियमांचं व्यवस्थित पालन करावं. हिल स्टेशनला गर्दी होतेय, ही गर्दी होणार नाही, याची काळजी घ्यावी. नियमांचं पालन करावं, असं आवाहनही त्यांनी केलं.
मुंबईत दरवर्षी थर्टीफर्स्टला ज्या ठिकाणी गर्दी होते, त्याबाबत सरकारने काही सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार मुंबईत गेट वे ऑफ इंडिया, मरिन ड्राईव्ह यासारख्या ठिकाणीही ५ पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊ नये, असं आवाहन अनिल देशमुख यांनी केलं आहे.
News English Summary: Home Minister Anil Deshmukh has appealed to the people of the state to celebrate the coming New Year in peace and simplicity as the Corona crisis is looming. Hotels, restaurants, pubs and bars will be open till 11 pm for New Year celebrations. But it will be closed after 11 pm. This means there is no restriction on going out of the house for medicines, meals, going to a friend.
News English Title: New year celebration guidelines confirmed by state home minister Anil Deshmukh news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News