27 July 2024 10:10 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | कर्जमुक्त कंपनी रिलायन्स पॉवरचा शेअर 'पॉवर' दाखवणार, 29 रुपयांचा शेअर खरेदीला गर्दी Smart Investment | पैशाने पैसा बनवतो हा फॉर्म्युला, वयाच्या 40 आधीच स्वतःचा आलिशान फ्लॅट खरेदी करू शकाल OTT Most Watch Film | OTT वर सर्वाधिक पाहिले जात आहेत हे हिंदी चित्रपट, थ्रिलर सिनेमा टॉप ट्रेंडमध्ये Upcoming Movies | 15 ऑगस्टला बॉक्स ऑफिस धमाका; या चार सिनेमांची चित्रपटगृहात होणारं थेट भेट Bonus Share News | कमाईची संधी सोडू नका! ही कंपनी फ्री शेअर्स देणार, शॉर्ट टर्म मध्ये पैसा वाढवा HFCL Share Price | 5G संबंधित HFCL सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा HUDCO Share Price | मल्टिबॅगर शेअरसाठी BUY रेटिंग, कंपनीबाबत अपडेट आली, यापूर्वी 400% परतावा दिला
x

मोदींसाठी पुण्यात भाजपचे इव्हेंट मार्केटिंग | विद्यार्थी रविवारी सुद्धा युनिफॉर्ममध्ये शाळेत | नेटिझन्सकडून टीका

PM Narendra Modi

मुंबई, 06 मार्च | आज पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन झालं आहे. सुरुवातीला पुणे महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं उद्घाटन करण्यात आलं. मोदींच्या हस्ते पुणे मेट्रो मार्गिकेचं लोकार्पण झालं. त्यानंतर MIT कॉलेजमध्ये मोदींची सभा पार पडली.

पुणे मेट्रोचं उद्घाटन :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पुणे मेट्रोचं उद्घाटन पार पडलं. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी मोबाईलद्वारे मेट्रोचं तिकीट काढलं आणि पुणे मेट्रोचा प्रवास करणारे पंतप्रधान मोदी हे पहिले प्रवासी ठरले. गरवारे स्टेशन ते आनंद नगर स्टेशन असा पाच किलोमीटरचा प्रवास पंतप्रधान मोदींनी मेट्रोतून केला. तत्पूर्वी मोदींनी गरवारे मेट्रो स्थानकातील प्रदर्शनाचं उद्घाटन केलं आणि मेट्रोला हिरवा झेंडाही दाखवला. तत्पूर्वी मेट्रोच्या अधिकाऱ्यांकडून पंतप्रधानांनी संपूर्ण प्रकल्पाची माहिती घेतली.

विद्यार्थ्यांशी मोदींचा संवाद :
पंतप्रधान मोदी यांनी गरवारे मेट्रो स्टेशन ते आनंद नगर मेट्रो स्टेशन दरम्यान प्रवास केला. तेव्हा त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. लहान मुला मुलींनी पंतप्रधानांना यावेळी अनेक प्रश्न विचारले. तसंच मोदींनीही विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. यावेळी मोदींनी विद्यार्थ्यांचीही आस्थेवाईकपणे चौकशी केली.

समाज माध्यमांवर जोरदार टीका :
मात्र समाज माध्यमांनी हा केवळ मोदींचा मार्केटिंग बहाणा आहे अशी जोरदार टीका सुरु केली आहे. कारण आज सुट्टीच्या दिवशी म्हणजे रविवारी सुद्धा विद्यार्थी शाळेचा गणवेश घालून शाळेसाठी निघाले आहेत हे पाहून नेटिझन्सनी भाजप आणि मोदींच्या मार्केटिंग स्क्लीलची खिल्ली उडवली आहे. विशेष म्हणजे अनेकांनी या इव्हेंटच्या संबंध उद्या उत्तर प्रदेशात होणाऱ्या सातव्या टप्य्यातील मतदानाशी जोडला आहे. त्यामुळेच अजून अपूर्ण असलेल्या विषयात हा थेट प्रक्षेपणाचा इव्हेन्ट घाट घातला गेला असं अनेकांनी सोशल मीडियावर म्हटले आहे. जेव्हा एखाद्या राज्यात निवडणुका असतात आणि मतदानाच्या आधी निवडणुकीची आचारसंहिता असली की मोदींची मार्केटिंग इतर राज्यात असे इव्हेन्ट घडवून आणते आणि त्याचे थेट प्रक्षेपण करण्याचा घाट घालते अशी टीका केली आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो कडून बातमी शेअर करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: PM Narendra Modi in Pune on 06 March 2022.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x