19 January 2022 12:55 AM
अँप डाउनलोड

पुण्याच्या जिल्हाधिकारी पदावर अभ्यासू आणि कार्यश्रम डॉ. राजेश देशमुख यांची नियुक्ती

Pune, Rajesh Deshmukh, New District Collector

पुणे, १७ ऑगस्ट : पुण्याच्या जिल्हाधिकारी पदावर डॉ. राजेश देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नवल किशोर राम यांची पंतप्रधान कार्यालयात प्रतिनियुक्ती झाल्यावर पुण्याचे जिल्हाधिकारी पद रिक्त होते. त्यामुळे आता पुण्याच्या जिल्हाधिकारीपदाची जबाबदारी राजेश देशमुख यांच्याकडे देण्यात आली आहे.

डॉ. राजेश देशमुख हे सन २००८ सालच्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी सातारा जिल्हा परिषदेचे सीईओ म्हणून देखील काम पाहिले आहे. त्यानंतर आता पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची ते जागा घेतील. राम यांची पंतप्रधान कार्यालयात उपसचिव पदावर नियुक्ती करण्यात आल्यानंतर त्यांची जाग रिक्त झाली होती.

तत्पूर्वी यवतमाळ जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारण्यापूर्वीच त्यांनी तिथल्या विविध समस्यांचा अभ्यास केला होता. तसेच पदभार स्वीकारल्याच्या पहिल्याच दिवशी शेतकरी आत्महत्या, पीककर्ज, कर्जमाफी आणि पाणीटंचाई सारख्या गंभीर विषयांवर स्वतंत्र बैठका आयोजित करून स्थानिक नागरिकांना कसा दिलासा देता येईल यावर लक्ष केंद्रित केलं होतं. दरम्यान, राज्य सरकारच्या ५ महत्वाच्या योजनांची काटेकोर अंमलबजावणी करून त्यामध्ये यवतमाळ जिल्ह्याला राज्यात अव्वल क्रमवारीत पोहोचवले. पाण्याची समस्या भीषण असल्याने त्यासंबंधित विषयांवर गंभीरपणे लक्ष केंद्रित केलं होतं.

त्यावेळी राज्य शासन, टाटा ट्रस्ट, रिलायन्स फाउंडेशन, ऍक्सिस बँक फाउंडेशन आणि बायएफ’च्या माध्यमातून मुख्यमंत्री ग्राम सामाजिक परिवर्तन राबवून यवतमाळ जिल्ह्यातील तब्बल ३६ ग्रामपंचायतीच्या ७२ गावांमध्ये स्वतःच्या प्रशासकीय कुशलतेतून विकासाचं उत्तम उदाहरण निर्माण केलं. टाटा ट्रस्टने यवतमाळ आणि नेर तालुक्यात मत्स्यपालन, सौरऊर्जेवरील अंगणवाडी तसेच डिजिटल शाळा निर्मितीच्या कामांना बळ दिले. विशेष म्हणजे इथे पिण्याचे पाणी, किचन गार्डन आणि शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन केल्या. बायफ’ने ग्रामस्थांचे जीवनमान उंचावणे, तसेच व्यवसाय कसा करावा आणि त्या संबंधित प्रस्ताव कसा बनवायचा याचे ग्रामस्थांना मागदर्शन केलं आणि त्यांच्यातला उद्योजक जागृत करण्यावर भर दिला होता.

इतकंच नव्हे तर लोकशाही आणि सामान्य जनता हेच आपल्या देशाचा मूळ गाभा असल्याने निवडणूक प्रक्रियेतील संभ्रम लोकांच्या मनातून दूर करण्यासाठी गावोगावी आधुनिक ईव्हीएम मशिन्स मागवल्या आणि लोकांना त्याविषयी मार्गदर्शन करून मोठ्याप्रमाणावर जनजागृती सुद्धा केली होती. प्रसार माध्यमांनी त्यांच्याशी संपर्क साधून जिल्ह्याच्या विकासाची माहिती करून घेतली तेव्हा जिल्ह्याला मिळालेल्या बहुमानाचे श्रेय म्हणजे ग्रामस्थांच्या श्रमाचे फलित असल्याचे सांगितले होते आणि त्यातून त्यांच्यातला जिल्हाधिकारी नव्हे, तर स्वतःच्या टीम’ला सोबत घेऊन ‘टीमवर्क’ने स्वप्न सत्यात उतरवणारा कुशल ‘प्रशासकीय लीडर’ समोर आला. कारण कोणत्याही गावात कोणतीही योजना ग्रामस्थांच्या प्रत्यक्ष सहभागाशिवाय सत्यात उतरूच शकत नाहीत, असा त्यांचा ठाम विश्वास आहे. आज तेच कार्यश्रम अधिकारी पुणे जिल्ह्याला लाभले आहेत.

 

News English Summary: After the appointment of Pune District Collector Naval Kishore Ram as Deputy Secretary in the Prime Minister’s Office, the names of several officers were discussed in his place. Finally Dr. Rajesh Deshmukh has been appointed as the new District Collector of Pune.

News English Title: Rajesh Deshmukh Is The New District Collector Of Pune News Latest updates.

हॅशटॅग्स

#RajeshDeshmukh(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x