15 December 2024 5:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, कमाईची मोठी संधी Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये
x

त्यांना डॉक्टरांपेक्षा जास्त कळतं म्हणाले | मग म्हणाले डॉक्टरांना काही कळत नाही - केदार शिंदे

Marathi Film director Kedar Shinde, Shivsena MP Sanjay Raut, Doctors statement

मुंबई, १७ ऑगस्ट : मी डॉक्टरांचा कोणताही अपमान केलेला नाही. शाब्दिक कोटी आणि अपमान यांच्यातला फरक आपल्याला कळायला हवा, असे वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले. ते सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. संजय राऊत यांनी नुकत्याच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कंपाऊडरला डॉक्टरपेक्षा जास्त ज्ञान असते, अशा आशयाचे विधान केले होते. संजय राऊत यांच्या या वक्तव्यानंतर डॉक्टरांच्या काही संघटना आक्रमक झाल्या होत्या.

‘डॉक्टरांपेक्षा कम्पाउंडर बरा’ अशा वक्तव्यापूर्वी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मुलाखत घेताना त्यांना डब्लूएचओ पेक्षा उद्धव ठाकरेंना अधिक ज्ञान आसायचा साक्षात्कार झाला होता. त्यावेळी देखील खासदार संजय राऊत यांच्यावर टीका झाली होती. सध्या याच डॉक्टरांबद्दलच्या विधानावरून त्यांना राजकीय पक्ष, डॉक्टरांच्या संघटना आणि आता कलाक्षेत्रातील लोकं लक्ष करत आहेत.

मराठी चित्रपट श्रुष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांनी संजय राऊतांच्या दोन्ही विधानांचा संदर्भ घेऊन त्यांची ट्विटरवर नाव न घेता फिरकी घेतली आहे. त्यांनी मिश्किल ट्विट करताना म्हटलं आहे की, “त्यांना डॉक्टरांपेक्षा जास्त कळतं म्हणाले. मग म्हणाले ,डॉक्टरांना काही कळत नाही.. #confusion”

 

News English Summary: Kedar Shinde, a well-known director in the Marathi film industry, has taken to Twitter without mentioning his name, referring to both the statements of Sanjay Raut. He said in a mischievous tweet that he knew more than a doctor. Then he said the doctor didn’t know anything

News English Title: Marathi Film director Kedar Shinde criticized Shivsena MP Sanjay Raut over doctors statement News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Sanjay Raut(262)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x