12 December 2024 6:20 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

अन्यथा पुढील ६ महिने प्रतिदिन ६ हजारहून अधिक मुलांचा मृत्यू होऊ शकतो - युनिसेफ

Corona Crisis, covid 19, Unicef

नवी दिल्ली, १५ मे: काल डब्ल्यूएचओच्या एका महत्वाच्या व्यक्तीने महत्वाचं वक्तव्य करून चिंता वाढवली होती. जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) प्रमुख वैज्ञानिक सौम्या स्वामीनाथन यांनी एफटीच्या ग्लोबल बोर्डरूम डिजिटल कॉन्फरन्सदरम्यान याविषयावर बोलताना म्हटलं की ‘कोरोना नियंत्रणात येण्यास किमान ४ ते ५ वर्षांचा कालावधीत लागू शकतो. याबाबत डेली मेलने सविस्तर वृत्त दिले असून सौम्या स्वामीनाथन यांच्या विधानाने संपूर्ण जगाचा जीव सध्या टांगणीला लागला आहे असंच म्हणावं लागेल.

मात्र त्यानंतर आता युनिसेफने दिलेल्या इशाऱ्यामुळे पालकांची चिंता वाढण्याची शक्यता आहे. कोरोना संकटामुळे आरोग्य यंत्रणांवर आलेल्या दबावामुळे नियमित सेवांवर परिणाम झाला आहे. याचा मोठा फटका लहान मुलांना बसू शकतो, असा धोक्याचा इशारा युनिसेफनं दिला आहे. कोरोना संकटाचा जगभरात आरोग्य व्यवस्थेवर अतिरिक्त ताण आला आहे. त्याचा परिणाम लहान मुलांना मिळणाऱ्या आरोग्य सेवांवर होण्याची शक्यता आहे. परिस्थितीत सुधारणा न झाल्यास आगामी सहा महिने दररोज ६ हजारहून अधिक मुलांचा मृत्यू होऊ शकतो, अशी भीती युनिसेफनं व्यक्त केली आहे.

कोरोना संकटाचा मोठा परिणाम लहान मुलांवर होईल. बालमृत्यूदरात मोठी वाढ होईल. पाच वर्षांखालील मुलांना याचा मोठा फटका बसेल. या मुलांना आरोग्य सेवा देण्यासाठी १.६ अब्ज डॉलरच्या मदतीची आवश्यकता असल्याचं युनिसेफनं म्हटलं आहे. ‘कोरोना संकटामुळे लहान मुलांच्या आरोग्य सेवांवर परिणाम झाला आहे. याबद्दल तत्काळ पावलं न उचलल्यास पाच वर्षांहून कमी वयाच्या मुलांना मृत्यूचा धोका वाढेल. पुढील ६ महिने दररोज ६ हजारहून अधिक मुलांचा मृत्यू होण्याची दाट शक्यता आहे,’ अशी भीती युनिसेफच्या कार्यकारी संचालिका हेन्रिटा फोरे यांनी बोलून दाखवली.

आपण कोरोना नंतरच्या जगाची कल्पना करताना लहान मुलांचं आरोग्य जपण्यासाठी निधीची आवश्यकता आहे. हा निधी मिळाल्यास मुलांना सुदृढ राखण्यास मदत होईल, असं फोरे म्हणाल्या. योग्य वेळी मुलांवर आरोग्य सेवा न मिळाल्यास पुढील सहा महिने दररोज ६ हजार मुलं जीव गमावतील, अशी आकडेवारी अमेरिकेतल्या जॉन्स हॉपकिन्स ब्लूमबर्ग स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या संशोधकांच्या विश्लेषणावर आधारित आहे. लॅन्सेट ग्लोबल हेल्थ नावाच्या मासिकात ही आकडेवारी बुधवारी प्रसिद्ध झाली.

तत्पूर्वी, कोरोना व्हायरस कदाचित कधीच संपणार नाही. जगाला आता या व्हायरससोबत जगणे शिकावे लागेल असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने बुधवारी दिला. ‘अन्य विषाणूंप्रमाणे कोरोना व्हायरस कायम सोबत राहू शकतो. कदाचित तो कधीच नष्ट होणार नाही’ असे मायकल जे रेयान म्हणाले. ते WHO च्या आरोग्य आपातकालीन कार्यक्रमाचे प्रमुख आहेत.

 

News English Summary: Corona is likely to have an impact on the health services children receive. UNICEF fears that if the situation does not improve, more than 6,000 children could die every day in the next six months.

News English Title: Corona virus Becoming Child Rights Crisis 6,000 Children Could Die Daily says UNICEF News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x