14 December 2024 12:37 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

RSS तसेच अन्य संस्थांच्या परिश्रमांमुळे धारावीत कोरोनावर नियंत्रण - आ. नितेश राणे

Dharavi corona, RSS, WHO, BJP MLA Nitesh Rane

मुंबई, ११ जुलै : जागतिक आरोग्य यंत्रणेचे WHO प्रमुख टेड्रोस घेब्रेयसिस यांनी शुक्रवारी मुंबईच्या धारावी परिसरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांचे कौतुक केले. कोरोनाचा प्रादुर्भावकितीही तीव्र असला तरी त्यावर नियंत्रण मिळवता येऊ शकते, हे धारावीने सिद्ध करून दाखवल्याचे त्यांनी सांगितले.

टेड्रोस घेब्रेयसिस यांनी शुक्रवारी झालेल्या पत्रकारपरिषदेत हे वक्तव्य केले. यावेळी त्यांनी कोरोनाचे संकट यशस्वीपणे परतवून लावणाऱ्या जगातील काही भागांचा उल्लेख केला. त्यांनी म्हटले की, व्हिएतनाम, कंबोडिया, न्यूझीलंड, इटली, स्पेन, दक्षिण कोरिया, तसेच अत्यंत दाटीवाटीची लोकसंख्या असलेल्या मुंबईतील धारावी परिसरात सामूहिक प्रयत्नांच्या माध्यमातून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखता येऊ शकतो, हे सिद्ध झाले आहे. टेस्टिंग, ट्रेसिंग, आयसोलेशन आणि आजारी लोकांवर उपचार हेच कोरोनाची साखळी तोडण्याचे मार्ग आहेत. जगभरात अशी आणखी अनेक उदाहरणे सापडतील. यावरुन एकच सिद्ध होते की, कोरोनाचा प्रादुर्भाव कितीही तीव्र असला तरी त्यावर नियंत्रण मिळवता येऊ शकते, असे घेब्रेयसिस यांनी म्हटले.

दुसरीकडे धारावीतील कोरोना रुग्णसंख्या महाराष्ट्र सरकारमुळे नाहीतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अन्य संस्थांच्या कामामुळे नियंत्रणात आल्याचं भाजपच्या नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय की, “आरएसएस आणि अन्य समाजसेवी संघटनांनी धारावीत दिवसरात्र मेहनतर करुन मदत केली, तिथल्या लोकांमध्ये जनजागृती केली. धारावी कोरोना रुग्ण घटण्याचं एकमेव कारण म्हणजे RSS आणि अन्य संस्था आहेत. महाराष्ट्र सरकारचं काहीही योगदान नाही. WHO ने उगाचचं याचं श्रेय महाराष्ट्र सरकारला देण्यापेक्षा खरं ज्यांनी मेहनत केली आहे, त्यांना दिलं असतं तर समाधान वाटलं असतं”, असं नितेश राणे म्हणाले.

 

News English Summary: The RSS and other social organizations worked hard day and night in Dharavi to help and create awareness among the people. The only reason for the decline in Dharavi corona patients is the RSS and other organizations. The Maharashtra government has made no contribution.

News English Title: The only reason for the decline in Dharavi corona patients is the RSS and other organizations said BJP MLA Nitesh Rane News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Nitesh Rane(100)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x