3 May 2024 4:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर Stocks To Buy | सुवर्ण संधी! तज्ज्ञांनी निवडले टॉप 5 शेअर्स, झटपट 45 टक्केपर्यंत कमाई होईल
x

राज भेटीचा पायगुण | उद्यापासून सर्व ग्रंथालये सुरू होणार

Libraries service, Start tomorrow, Unlock 5

मुंबई, १४ ऑक्टोबर : उपनगरीय लोकल सेवा आणि मुंबई मट्रो सेवा पूर्ववत कधी सुरू होणार याची लाखो प्रवाशांना प्रतीक्षा असतानाच राज्य सरकारने मिशन बिगिन अगेन अंतर्गत खूप मोठा निर्णय आज घेतला आहे. मुंबईतील मेट्रोसेवेला हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे.

शिक्षण क्षेत्राबद्दल महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. 50 टक्के शिक्षकांच्या उपस्थितीत शाळा सुरू करता येणार आहे. 50 टक्के शिक्षकांना क्षमतेनं शाळेत बोलावता येणार आहे. परंतु, 31 ऑक्टोबरपर्यंत शाळा बंद राहणार आहे.

राज्यात काही दिवसांपासून ग्रंथालये, मेट्रो, आठवडी बाजार सुरू करावेत यासाठी मागणी करण्यात येत होती. त्यानुसार राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेत राज्यातील सर्व ग्रंथालये उद्यापासून (15 ऑक्टोंबर) सुरू करण्यास परवानगी दिली आहे. तसेच टप्याटप्याने मुंबईतील मेट्रो सेवा सुरू करण्यासही सरकारने परवानगी दिली आहे. मेट्रो सेवा सुरू करण्याबाबतची SOP लवकरच नगरविकास विभागाकडून जारी करण्यात येणार आहे.

तत्पूर्वी, राज्यातील ग्रंथालयांची कवाडे खुली करा, या मागणीसाठी ग्रंथालयांच्या प्रतिनिधींनी मागील गुरुवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज या निवासस्थानी भेट घेतली होती. या भेटीत राज्यातील ग्रंथालयांच्या प्रतिनिधींनी ग्रंथालय पुन्हा सुरू करा, अशी मागणी करत राज यांना निवेदनही दिले होते. राज्यात पुनश्च हरी ओम अंतर्गत हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत आहे. याच अनुषंगाने राज्यातील ग्रंथालये सुरू करण्यात यावी, ही मागणी घेऊन ग्रंथालयांचे विश्वस्त आणि संचालक मंडळाने राज ठाकरेंची भेट घेतली होती. त्यानंतर राज्य सरकारच्या आजच्या निर्णयात ग्रंथालयाची समस्या देखील सुटली आहे आणि त्यामुळे राज भेट फलदायी ठरल्याचं दिसतं आहे.

 

News English Summary: A day after a bitter war of words broke out between Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray and Governor Bhagat Singh Koshyari over the reopening of the religious places in the state, the Maharashtra government allowed metro to resume operations in a graded manner from October 15. Business-to-business exhibitions will also be allowed in the state from Thursday. With necessary Covid-19 precautions, government and public libraries will be allowed to function. Shops and markets will remain open from 9am to 9pm. Local weekly markets, including that of animals, will be allowed from tomorrow. However, no decision on temples has been taken yet.

News English Title: Libraries service will start tomorrow important decision state government News updates.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x