1 May 2024 2:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | कमाईची मोठी संधी! अवघ्या 87 रुपये किमतीचा शेअर अल्पावधीत 30 टक्के परतावा देईल Vesuvius Share Price | अल्पावधीत 400% परतावा देणाऱ्या शेअरची एकदिवसात 15% उसळी, खरेदीला ऑनलाईन गर्दी Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरमध्ये ब्रेकआउट, या प्राईसवर मजबूत सपोर्ट, स्टॉकची पुढची टार्गेट प्राईस जाहीर Birlasoft Share Price | मालामाल होण्याची संधी! 633% परतावा देणारा शेअर चर्चेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट आली Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत तज्ज्ञांकडून महत्वाचा अपडेट, स्टॉक Hold करावा की Sell करावा? RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत सरकारात्मक अपडेट आली, शेअर सुसाट तेजीत धावणार, पुन्हा मल्टिबॅगर? Tata Motors Share Price | 1 वर्षात पैसे दुप्पट झाले, आता टाटा मोटर्स कंपनीबाबत अपडेट आली, शेअरला किती फायदा?
x

विधानपरिषदेच्या ४ जागा राष्ट्रवादीच्या कोट्यात | नाथाभाऊंचा नंबर नक्की?

NCP finalize list, MLC candidate, Governor nominated 12 seats

मुंबई, १४ ऑक्टोबर : घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, असा दावा एकनाथ खडसेंचे कट्टर समर्थक असलेले माजी आमदार उदेसिंग पाडवी यांनी केला आहे.

‘एबीपी माझा’च्या वृत्तानूसार, उदेसिंग पाडवी म्हणाले की, एकनाथ खडसे यांची राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा झाली असून घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार आहे. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसोबत चर्चा झाल्यानंतर पक्ष प्रवेशाचा निर्णय घेतला, असं एकनाथ खडसेंनी सांगितल्याचं उदेसिंग पाडवी यांनी सांगितले. तसेच एकनाथ खडसेंना राष्ट्रवादीत योग्य मानसन्मान मिळणार असून त्यांच्या प्रवेशाने उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत होणार असल्याचा दावा उदेसिंग पाडवी यांनी केला आहे.

दरम्यान, महाविकास आघाडी सरकारने विधानपरिषदेतील राज्यपाल नियुक्त १२ जागांसाठी उमेदवारांची निश्चिती केली आहे. त्यामुळे या बाबतची घोषणा लवकरच होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या संदर्भातील निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या (बुधवारी) आजच्या बैठकीत होण्याची शक्यता आहे. राज्यपाल नियुक्त १२ जागांपैकी ४ जागा राष्ट्रवादीच्या कोट्यात आल्याने राष्ट्रवादीकडून या जागांवर कोणाला संधी दिली जाणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागून होते.

भाजपचे वरिष्ठ नेते एकनाथ खडे येत्या १७ ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे यातील एका जागेवर त्यांची वर्णी लागू शकते. तर उरलेल्या तीन जागी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी, गायक आनंद शिंदे आणि उत्तमराव जानकर यांनी संधी मिळणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

यापैकी आनंद शिंदे आणि राजू शेट्टी यांच्या नावाची पूर्वीपासूनच चर्चा होती. काही दिवसांपूर्वीच राजू शेट्टी यांची राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी भेट घेतली होती. तसेच विधान परिषदेसाठी राजू शेट्टी यांचे नाव गेल्या अनेक दिवसापासून चर्चेत होते. राजू शेट्टी हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून राजू शेट्टी यांच्या नावाची शिफारस केली जाणार आहे.

 

News English Summary: The Mahavikas Aghadi government has finalized the candidates for the 12 governor-appointed seats in the Legislative Council. An announcement is likely to be made soon. A decision in this regard is likely to be taken at today’s meeting of the state cabinet (Wednesday). As 4 out of the 12 Governor-appointed seats are in the NCP’s quota, all eyes were on who would be given a chance in these seats by the NCP.

News English Title: NCP finalize list of MLC candidate for governor nominated 12 seats News updates.

हॅशटॅग्स

#Eknath Khadse(94)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x