13 December 2024 8:06 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

कॉमेडीयन झाले आता केतकी चितळेच्या पोस्टने पुन्हा वाद

After stand up comedian Agrima Joshua, Actress Ketaki Chitale, Chhatrapati Shivaji Maharaj

मुंबई, ११ जुलै : अग्रिमा जोशुआनंदेखील कॉमेडी करताना शिवाजी महाराजांवर विनोद केले. याविषयी नेटिझन्सनी संताप व्यक्त केला. अग्रिमा जोशुआने केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे महाराष्ट्राच्या भावना दुखावल्या असून तिच्यावर तातडीनं कारवाई करावी अशी मागणी सोशल मीडियात सुरु झाली. याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी अग्रिमा जोशुआ काम करत असलेल्या स्टुडिओची तोडफोड केली. यानंतर तिने लेखी माफीनामा सादर केल्याचे सांगण्यात येत आहे.

मनसेचे कार्यकर्ते यश रानडे यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विनोदामुळे अग्रिमा जोशुआ काम करत असलेल्या स्टुडिओची मनसे कार्यकर्त्यांकडून तोडफोड करण्यात आल्याचं यात दिसत आहे. तसंच, दुसऱ्या पोस्टमध्ये अग्रिमा जोशुआ हिने याबद्दल लेखी माफी मागितल्याचं सांगण्यात आलं आहे.

सदर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शिवप्रेमींनी तिच्यावर टीका केली. त्यानंतर आता मराठी अभिनेत्री केतकी चितळेने फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये तिने देखील छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी केला आहे.

काय म्हटलंय केतकी चितळेने?

शिवाजी, फक्त एवढे ऐकले की आम्ही उगाच पेटून उठणार. मजकूर आम्हाला तसाही कधी कळतच नाही, कारण तेवढी आमची बुद्धीमत्ता मुळातच नाही. मग ३ वर्षाच्या मुलाची बौद्धिक पातळी असलेले स्वघोषित मावळे, शिवाजी हा एक शब्द ओळखतात आणि महाराजांच्या शिकवणीला फाट्यावर मारून, महाराजांच्या नावावर राजकारण करायचा पोकळ विनोद सुरू करतात. बरं, अशा वागण्यानी आपण आपली लायकी दाखवून देतोय हे त्यांच्या लक्षात येत नाहीच. अर्थात हे कळण्यासाठीही नखाएवढी अक्कल लागतेच म्हणा!

सोशल मिडीयावर ‘मराठी’ असा शब्द टाकून वाटेल तसा वणवा, काही लाईक्ससाठी पेटवणारे २० ते २५ वयोगटातील पोरे, ज्यांना खऱ्या आयुष्यात कुणी भाव अथवा नोकरी ही देणार नाही अशी कार्टी, या सर्कस चे रिंग मास्टर असतात. अरे मूर्खांनो, शालेय शिक्षण तरी घ्या! पण ते तरी कसे घेणार, कारण आमचे प्रेरणास्थान तर आर्ची (नाव ही मराठी नाही) आणि पर्शा! आम्ही फक्त भांडण करण्यासाठी महाराज, बाबासाहेब, फुले यांची नावे घेणार, त्यांनी लिहिलेल्या साहित्याचा अभ्यास कोण करणार!!

सुधारणा करा बाळांनो, शिका.

 

News English Summary: After the video went viral on social media, Shivpremi criticized her. After that, now Marathi actress Ketki Chitale has shared a post on Facebook. In it, she has also singled out Chhatrapati Shivaji Maharaj.

News English Title: After stand up comedian Agrima Joshua comment Marathi actress Ketaki Chitale on Chhatrapati Shivaji Maharaj News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Ketki Chitale(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x