15 October 2019 10:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
#VIDEO: सांगली-कोल्हापूरचा महापूर आणि मनसेचं हे योगदान चंद्रकांत पाटलांचे डोळे उघडेल? सविस्तर भाजपच्या प्रचार पोवाड्यात महाराजांचा पुतळा राष्ट्रवादीने उभारलेला अन मेट्रो काँग्रेसच्या काळातील तरुणांमध्ये बँकिंग क्षेत्र आणि सरकारी नोकरीप्रति अधिक आकर्षण: ओलिवबोर्डच सर्वेक्षण नारायण राणेंचा 'महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष' भाजपमध्ये विलीन VIDEO: राज ठाकरेंचा दावा सत्य! टोलमुक्त महाराष्ट्र करण्याचं वचन उद्धव ठाकरेंनी दिलेलं; त्याचा हा पुरावा आदित्य ठाकरेंचं 'केम छो' नंतर 'अय्यो लुंगी', मतांसाठी 'लुंगी हटाव' नाही तर 'लुंगी पहनों' धक्का! नाशिकमधील भाजप-शिवसेनेतील युती तुटली
x

सेनेचा मुख्यमंत्र्यांना शह? जलयुक्त शिवार योजनेत गैरव्यवहार झाल्याची जलसंधारण मंत्र्यांची कबुली

Shivsena, Tanaji Sawant, Devendra Fadanvis, BJP Maharashtra

मुंबई : सध्या राज्य सरकारचं पावसाळी अधिवेशन सुरु असल्याने विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना फैलावर घेतल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र आजच्या एका धक्कादायक कबुलीने शिवसेनेने अप्रत्यक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शह दिल्याचं म्हटलं जात आहे. कारण राज्यातील महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजना ही मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असून देखील शिवसेनेने म्हणजे जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी सभागृहाला दिलेल्या कबुलीने खळबळ माजली आहे.

आज विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडेंच्या प्रश्नाला जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी उत्तर देताना राज्यातील पुरंदर तालुक्यातील जलयुक्त शिवार शिवरच्या कामात गैरव्यवहार झाल्याचे जलसंधारण विभागाने मान्य केलं आहे. तसेच या प्रकरणाची प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंध विभागाने गुप्त चौकशी केल्याचे छापील उत्तरात नमूद केले आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजनेला भ्रराष्टाचाराचे गालबोट लागल्याचे उघडकीस आलं आहे. महाराष्ट्रात जलयुक्त शिवाराच्या कामात पडद्याआड मोठे गैरव्यवहार झाल्याची कबुली खुद्द जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी सभागृहात दिली आहे. आज प्रश्नोत्तराच्या तासात जलसंधारणासंदर्भात विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी प्रश्न विचारला असता ही बाब प्रसार माध्यमांच्या देखील समोर आली आहे.

विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडेंच्या प्रश्नाला जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी उत्तर देताना राज्यातील पुरंदर तालुक्यातील जलयुक्त शिवार शिवरच्या कामात गैरव्यवहार झाल्याचे जलसंधारण विभागाने मान्य केलं आहे. तसेच या प्रकरणाची प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंध विभागाने गुप्त चौकशी केल्याचे छापील उत्तरात नमूद केले आहे.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(311)#Shivsena(615)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या