18 July 2019 11:07 PM
अँप डाउनलोड

VIDEO: बिल्डरकडून फसवणूक; गुजराती कुटुंबसुद्धा मनसेच्या आश्रयाला; दणका मिळताच २१ लाख मिळाले

VIDEO: बिल्डरकडून फसवणूक; गुजराती कुटुंबसुद्धा मनसेच्या आश्रयाला; दणका मिळताच २१ लाख मिळाले

मुंबई : मुंबईमध्ये बांधकाम व्यावसायिकांकडून सामान्य लोकांना लुबाडण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर समोर येत आहेत. तसाच एक प्रकार मुंबईतील मालाड येथे राहणाऱ्या गुजराती कुटंबासोबत घडला आहे. संबंधित बिल्डरने या गुजराती कुटंबाला तब्बल २१ लाखांचा चुना लावला होता. प्रकल्पात पैसे गुंतवून देखील मागील ५ वर्ष ना घरचा ताबा मिळत होता, ना पैसे परत दिले जात होते. संबधित कुटुंबाचे पैसे जवळपास बुडाल्यातच जमा होते.

मात्र समाज माध्यमांवरून मनसेचे कार्यकर्ते तुलसी जोशी यांच्याशी संपर्क करून संबंधित कुटुंबाने मदतीसाठी विनंती केली होती. तुलसी जोशी यांच्या कॉल नंतर संबंधित बांधकाम व्यावसायिकाने या कुटुंबाचे तब्बल २१ लाख परत केल्याने त्यांनी प्रसन्न होऊन तुलसी जोशींची पालघर येथे जाऊन भेट घेतली आणि त्यांचे आभार मानले.

दरम्यान मुंबई आणि आसपासच्या शहरांमध्ये अनधिकृत बांधकामांनी मोठ्या प्रमाणावर डोकं वर काढल्याने असे फसवणुकीचे प्रकार मोठ्या प्रमाणावर समोर येताना दिसत आहेत. विशेष म्हणजे पोलिसांकडून अशा फसवणुकीच्या प्रकरणी केवळ लेखी तक्रार नोंदण्याव्यतिरिक्त कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. परिणामी अशी पीडित लोकं प्रश्न सोडवण्यासाठी इतर मार्ग अवलंबताना दिसत आहेत.

VIDEO: संबंधित कुटुंबाने तुलसी जोशी यांची भेट घेऊन आभार व्यक्त केले.

अनुरूप वधू - वर सुचक मंडळ

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(348)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या