19 July 2019 9:38 AM
अँप डाउनलोड

ईव्हीएमला विरोध करत बॅलेट पेपरने निवडणुका घेण्यासाठी तृणमूलच्या खासदारांची निदर्शनं

ईव्हीएमला विरोध करत बॅलेट पेपरने निवडणुका घेण्यासाठी तृणमूलच्या खासदारांची निदर्शनं

नवी दिल्ली : काल बसपाच्या सर्वेसेवा मायावती यांनी इव्हीएमवर संशय व्यक्त करत अनेक प्रश्न उपस्थित केले होते. दरम्यान, यावेळी मायावतींनी लोकसभा निवडणुकीतील अनेक गैरप्रकारांवर प्रकाश टाकला होता. तसेच जगातील प्रगत देश देखील बॅलेट पेपरने निवडणुका घेत असताना आणि भारतात सर्वच विरोधी पक्षांचा इव्हीएमला विरोध असताना केवळ भाजप आणि निवडणूक आयोगच त्याच समर्थन करत आहे, असं मायावतींनी अधोरेखित करत वेगळाच संशय व्यक्त केला.

दरम्यान, आज तृणमूल काँग्रेसच्या सर्व खासदारांनी ईव्हीएमला विरोध करत बॅलेट पेपरने निवडणुका घेण्यासाठी संसदेबाहेर जोरदार निदर्शनं केली. देशातील लोकशाही धोक्यात असल्याचा गंभीर आरोप देखील यावेळी या खासदारांनी केला. ममता बॅनर्जी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर ईव्हीएम विरोधात प्रचंड आक्रमक झाल्या होत्या आणि त्याविरोधात आंदोलन छेडण्याचं देखील त्यांनी विरोधकांना आवाहन केलं होतं.

अनुरूप मराठी वधू - वर मोफत ऑनलाईन नोंदणी

हॅशटॅग्स

#Congress(237)#MamtaBanerjee(15)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या