नवी दिल्ली : ईव्हीएम हॅकिंगच्या प्रकरणाने आधीच देशातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असताना आता अजून काही दावे करण्यात आले आहेत. कारण परदेशी हॅकर सैयद शुजाने पुढे अजून काही दावे करताना म्हटले की, हैदराबाद स्थित भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्याला भेटायाला गेलेल्या माझ्या टीमच्या ११ मित्रांची सुद्धा हत्या करण्यात आली. ही संपूर्ण टीम भारतीय जनता पक्षाला ब्लॅकमेल करण्यासाठी गेली होती, असेही त्याने स्पष्ट केले आहे.
शुजाने दिलेल्या पुढील माहितीनुसार, एक भारतीय पत्रकार त्याला भेटायला थेट अमेरिकेत दाखल झाला होता. त्या पत्रकाराने शुजासोबत बोलताना सांगितलेले की या प्रकरणाबद्दल मला भारतात वाच्या फोडायची आहे. परंतू वस्तुतः भारतात परतल्यावर त्याने तसे काहीच केले नाही. ‘हाऊ डेयर यू’ असे म्हणत हा पत्रकार नेहमी टेलिव्हिजन वर ओरडत असतो. एवढेच नाही तर, ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या सुद्धा ईव्हीएम हॅकिंगशी जोडली आहे, असा धक्कादायक खुलासा त्याने केला आहे. लंकेश या EVM मशीन हॅकिंग संबंधित बातमी उघड करून त्याची पोलखोल करणार होत्या. परंतु, त्याआधीच त्यांना ठार मारण्यात आले असा दावा सुद्धा केला आहे.
दरम्यान, त्याची टीम २०१४ मध्ये हैदराबादच्या एका भारतीय जनता पक्षाच्या नेत्याला भेटली होती. आमच्या टीमने त्या नेत्याला ब्लॅकमेल केले होते. ते आम्ही सर्व केवळ मजेसाठी आणि त्यांना घाबरवण्यासाठी केले होते. परंतु, त्यांना सर्वांना नंतर गोळ्या झाडण्यात आल्या. त्यामध्ये माझे ११ सहकारी मित्र मारले गेले. मी सुद्धा जखमी झालो होते. ही घटना हैदराबादच्या उपनगरात घडली होती. दुसऱ्या दिवशीच किशनबाग दंग्यामध्ये ३ जण मारले गेले होते. यामुळे मला सुद्धा मारण्यात येईल या भीतीने मी थेट अमेरिका गाठली, असे शुजाने स्पष्टीकरण दिले आहे.
