23 April 2024 6:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 24 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 24 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Communication Share Price | टाटा कम्युनिकेशन्स शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राईस जाहीर Waaree Renewables Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा शेअर! 6 महिन्यात 850% परतावा, तर 1 वर्षात 1250% परतावा दिला Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या कंपनीचा शेअर अप्पर सर्किट तोडतोय, वेळीच खरेदी करा Dynacons Share Price | कुबेर पावेल! हा शेअर खरेदी करा, 15 दिवसात दिला 83% परतावा, यापूर्वी 7657% परतावा दिला Voltas Share Price | टाटा तिथे नो घाटा! व्होल्टास शेअर्सची रेटिंग अपग्रेड, स्टॉक अल्पावधीत 38 टक्के परतावा देईल
x

Petrol Diesel Price | केंद्र सरकारने करकपात न केल्यास पेट्रोल-डिझेल अजून महागणार

Petrol diesel price

नवी दिल्ली, २९ सप्टेंबर | आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑइल भाव तीन वर्षांच्या विक्रमी तेजीवर पोहोचले आहे. याची किंमत प्रति बॅरल ८० डॉलर पार पोहोचली आहे. याआधी ऑक्टोबर २०१८ मध्ये हा ७८.२४ डॉलरवर होता. अमेरिकी कच्चे तेल डब्ल्यूटीआयही १.१% महाग होऊन ७४.८० डॉलर प्रति बॅरल झाले. दोन्ही इंधनांत सलग पाचव्या दिवशी उसळी दिसली. केंद्र व राज्य सरकारांनी कर कपात केली नाही तर भारतात आगामी दिवसांत पेट्रोल-डिझेलचे ३ रुपयांपर्यंत महाग (Petrol Diesel Price) होऊ शकते. एक महिन्याआधी कच्च्या तेलाचे दर ७० डॉलर प्रति बॅरल हाेते. म्हणजे, एका महिन्यात यात १४.३% ची वाढ झाली आहे. या वर्षी जानेवारीत हे प्रति बॅरल ५१ डॉलर होते. या हिशेबाने या वर्षी याच्या दरात ५६.९% ची वाढ झाली.

US crude also rose 1.1% to. 74.80 a barrel. Both fuels surged for the fifth day in a row. If the central and state governments do not cut taxes, petrol-diesel price in India may go up to Rs 3 in the coming days :

यामुळे क्रूडमध्ये दरवाढ होते:
* क्रूडच्या मागणीच्या प्रमाणात पुरवठा आणि उत्पादनात घट.
* आगामी हिवाळ्यात मागणी आणखी वाढण्याचा दबाव.
* पुरवठा कायम राहण्यासाठी पुरेशी गुंतवणूक केली जात नाही.
* ओपेक समूहाकडून उत्पादनावर अंकुश लावणे आणि जागतिक आर्थिक सुधारणेमुळे मागणीत वाढ

डिसेंबरपर्यंत 90 डॉलर प्रति बॅरल:
उत्पादनात वाढ न झाल्यास कच्च्या तेलाचे दर वाढतील. यंदा दर ९० डॉलर प्रतिबॅरलवर जाऊ शकतात. दुसरीकडे, ब्रिटिश पेट्रोलियम सिंगापूरचे अध्यक्ष यूजीन लेओंग म्हणाले, २०२२ च्या तिसऱ्या तिमाहीत जागतिक तेलाचा वापर कोरोनापूर्वीच्या पातळीवर येऊ शकते.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Petrol diesel price will increase if taxes are not cut by government.

हॅशटॅग्स

#Petrol Price(96)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x