12 December 2024 12:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Amazon Sale | ॲमेझॉन सेलमधील Realme स्मार्टफोनचे दर पाहून हडबडून जाल; हजारो रुपयांनी स्वस्त झाले हे 3 स्मार्टफोन्स SIP Mutual Fund | गुंतवणुकीचा राजमार्ग; योग्य पद्धतीने गुंतवणूक करून 5 कोटींची संपत्ती तयार करता येईल, अशा पद्धतीने गुंतवा पैसे Maruti Suzuki Swift | या कारच्या खरेदीसाठी शो-रूम मध्ये गर्दी, 6.49 लाखांची बजेटमधील कार खरेदी करा, फीचर्स जाणून घ्या BHEL Share Price | मल्टिबॅगर BHEL सहित हे 4 शेअर्स 49 टक्क्यांपर्यंत परतावा देतील, टार्गेट नोट करा - NSE: BHEL Horoscope Today | नवीन वर्ष 'या' राशींसाठी असणार अत्यंत खास; शनीच्या साडेसातीपासून व्हाल कायमचे मुक्त Samvardhana Motherson Share Price | संवर्धना मदरसन सहित हे 4 शेअर्स 45% पर्यंत परतावा देतील, फायदा घ्या - NSE: MOTHERSON
x

EVM: विरोधकांनो भाजप नेत्याचं हे पुस्तक वाचा; प्रेरित व्हा; रस्त्यावर उतरा, अन्यथा नष्ट व्हा

EVM, Narendra Modi, Losabha Election 2019

नवी दिल्ली : सध्या देशात मोदी विरोधी वातावरण असताना भाजपाला मिळालेलं यश हे अनेकांना न समजण्यापलीकडील झालं आहे. अगदी नगरसेवक पदावर ८-१० हजार मतांचा पल्ला कधी गाठू न शकणारे ५-६ लाख मतं घेऊन घेऊन विजयी झाले. तसेच अनेक उमेदवारांना स्वतःचं आणि कुटुंबातील लोकं मतदान करत नसल्याचे दैवी चमत्कार देखील पाहायला मिळत आहेत. मात्र अशीच काहीशी स्थिती भाजपाची २००९ मधील निवडणुकीत झाली होती आणि लालकृष्ण अडवाणी पासून सर्व नेत्यांनी ईव्हीएम’वर संशय व्यक्त करत आगपाखड केली होती.

भाजपचे दिग्गज नेते ‘जीव्हीएल नरसिंहराव’ यांनी तर ईव्हीएमला विरोध म्हणून थेट एक पुस्तकच प्रसिद्ध केलं होतं, ज्याचं नाव आहे ‘Democracy at Risk’ जे आजही उपलब्ध आहे. लालकृष्ण अडवाणी यांची त्यावेळची बातमी पुरावा म्हणून देत आहोत आणि भाजप नेते राव यांनी लिहिलेलं पुस्तक ‘Democracy at Risk’ संबंधित बातमी ज्यामध्ये ईव्हीएम’ला विरोध का आहे यावर अनेक धक्कादायक खुलासे देण्यात आले आहेत. ‘Democracy at Risk’ या पुस्तकासंबंधित बातमी येथे वाचा.

दरम्यान, २००९ मधील निवडणुकीत भाजपचा पराभव झाला आणि त्यांनी पराभवाचं संपूर्ण खापर फोडलं होतं नव्याने अमलात आलेल्या ईव्हीएम वोटिंग मशीन द्वारे केल्या जाणाऱ्या मतदान प्रक्रियेवर. भाजपचे सर्व दिग्गज नेते त्यावेळी जाहीर पत्रकार परिषद घेऊन ईव्हीएम’मध्ये फेरफार करून काँग्रेस जिंकत असल्याचा आरोप केला होता. भाजपच्या त्या दिग्गज नेत्यांमध्ये सर्वात अग्रणी होते लालकृष्ण अडवाणी त्यांनी मोठ्या प्रमाणावर आगपाखड केली होती. दरम्यान, २०१४ च्या मोदी सरकारमधील माहिती तंत्रज्ञान केंद्रीय मंत्री आणि भाजपचे प्रवक्ते रविशंकर प्रसाद जे सध्या भाजपाची बाजू मांडताना, काँग्रेस स्वतःच्या पराभवाला EVM’ला दोषी ठरवत असल्याचं असल्याचं मोठ्या तावातावाने सांगताना दिसत ते देखील २००९मधील पराभवानंतर EVM मुळे भाजपचा पराभव झाला असा जाहीर पत्रकार परिषदा घेऊन आरोप करत, EVM बंदीची मागणी करत होते.

दरम्यान, भाजपचे सध्याचे राज्यसभेचे खासदार डॉ. सुब्रमणियन स्वामी यांनी देखील २००९ मधील पराभवाची समीक्षा करताना, नव्याने अमलात आलेल्या EVM मशीनमधील सहज शक्य असलेल्या फेरफारला दोष देत थेट न्यायालयात याचिका दाखल केली होती. विशेष म्हणजे त्यावेळी त्यांनी अनेक मुलाखतीत EVM मधील गड्बडीबाबत अनेक धक्कादायक खुलासे केले होते. त्यात त्यांना देखील स्वतःच्या मतदारसंघात आणि नाते वाहिकांच्या गावात शून्य मतं कशी मिळू शकतात जिथे त्यांचं मोठ्या प्रमाणावर समाज कार्य आहे आणि त्यांना मानणारा मोठा मतदार देखील आहे. नेमके तेच प्रकार आजही घडत आहेत आणि त्याची अनेक प्रत्यक्ष उदाहरणं देखील आहेत.

दरम्यान, त्यावेळी EVM बाबतची माहिती समजून घेण्यासाठी खासदार डॉ. सुब्रमणियन स्वामी यांनी EVM मशिन्स मशीन बनवणाऱ्या भारत इलेक्ट्रॉनिक कंपनीकडून माहिती घेताना, या EVM मशिन्सचा कोणते पार्ट भारतात बनतात आणि कोणते नाही याची माहिती घेतली. त्यावेळी ‘मायक्रो कंट्रोलर चिप’ भारतात नव्हे तर जपानच्या कंपनीकडून इम्पोर्ट केली जाते, जी सर्वात महत्वाचा आणि निवडणूक प्रक्रियेतील अत्यंत संवेदनशील पार्ट समाजाला जातो. त्यासाठी भारत इलेक्ट्रॉनिक कंपनीने जपानीस कंपनीसोबत एक करार केला आहे. दरम्यान डॉ. सुब्रमणियन स्वामी यांनी त्यावेळी थेट संबंधित ‘मायक्रो कंट्रोलर चिप’ पुरवणाऱ्या कंपनीशी संपर्क केला होता आणि त्यांना प्रश्न केला होता , ‘की जपान’मध्ये सुद्धा याच मायक्रो कंट्रोलर चिप’चा वापर केला जातो का?’. मात्र त्यांनी मला त्या जपानीस कंपनीने उत्तर दिलं की तुम्ही वेडे आहात का? आम्ही जपानमध्ये या अशा मशीन’ला हात देखील लावणार नाही आणि जपानमध्ये आजही असुरक्षित तंत्रज्ञानाच्या कारणामुळे बॅलेट पेपरचाच वापर केला जातो. त्यानंतर न्यायालयाने देखील अनेक उपाय सुचवले जे आजही अमलात आणले गेले नाहीत. त्यानंतर सर्वांनाच माहित आहे मोदी सरकार सत्तेत आले आणि राष्ट्रपतींपासून ते सर्वच संविधानिक जागांवर नव्या नियुक्त्या करण्यात आला आणि त्या नियुत्या जाणूनबुजून करण्यात आल्याचा आरोप अनेक राजकीय नेत्यांनी खुलेआम केले आहेत, ज्यामध्ये भाजपचा सहकारी पक्ष शिवसेना देखील सामील होता, जो भाजपसोबत स्वतःचा फायदा होताच पलटला.

VIDEO: भाजप खासदार डॉ. सुब्रमणियन स्वामी यांच्या खुलाशाबाबत तुम्हाला खाली पुरावा देखील देत आहोत

त्यामुळे भारतीय लोकशाहीत विरोधकांना स्वतःच अस्तित्व शिल्लक ठेवायचे असल्यास त्यांनी आधी भाजपचे आंध्र प्रदेशातील दिग्गज नेते जीवीएल नरसिंम्हा राव यांनी ईव्हीएमला विरोध म्हणून लिहिलेल्या ‘Democracy at Risk’ या पुस्तकचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन आणि प्रेरित होऊन देशभर बेलेटपेपर’साठी सरकार निर्णय घेईपर्यंत रस्त्यावरील तीव्र आंदोलन छेडण्याची गरज आहे. अन्यथा दर ५ वर्षांनी पुन्हा पुन्हा येणाऱ्या अशाच राजकीय त्सुनामीसहन करण्यासाठी स्वतःला मानसिक दृष्ट्या तयार करावे.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x