15 June 2021 8:43 PM
अँप डाउनलोड

काँग्रेस गोव्याचा बदला कर्नाटकात घेणार ?

कर्नाटक : आता कर्नाटक निवडणुकीतील सर्व २२२ जागांची मतमोजणी पूर्ण झाली आहे. एकूण चित्र जवळ जवळ स्पष्ट झाल्याने भाजपकडे स्पष्ट बहुमत नसल्याने काँग्रेस थेट भाजपची गोव्यातील खेळी कर्नाटकात अंमलात आणण्याच्या तयारीला लागला आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

कारण सध्या कर्नाटक विधानसभेचे एकूण संख्याबळ हे २२४ ऐवजी २२२ आहे. कारण जनता दलाचे कुमारस्वामी २ जागी निवडून आल्याने त्यातील एक जागा कमी होणार आहे. त्यामुळे २२१ जागांच्या कर्नाटक सभागृहात १११ जागा ह्या बहुमतासाठी आवश्यक असल्याचे स्पष्ट होत.

काँग्रेस आणि जनता दल सेक्युलरचे एकूण संख्याबळ ११४ झाले आहे. त्यात सुद्धा जर जनता दल सेक्युलर युतीमधील मायावतींच्या बसपाचे आमदार जर निकालानंतर सुद्धा जर जेडीएस बरोबर एकनिष्ठ राहिले तर त्यांच्या धर्मनिरपेक्ष युतीची संख्या एकूण ११५ वर जाऊन पोहोचेल. त्याप्रमाणे १११ या बहुमतासाठीच्या आवश्यक आकड्याच्या बेरीज चारणे जास्त होते. त्यामुळे सध्याच्या घडीला संख्याबळानुसार काँग्रेस – जनता दल सेक्युलर युती सभागृहातही आरामात बहुमत सिद्ध करु शकते.

कर्नाटकात काँग्रेसने देवेगौडा यांच्या जनता दल सेक्यूलर पक्षाला पाठिंबा देत देवेगौडा यांचे चिरंजीव कुमारस्वामी यांना थेट मुख्यमंत्रीपदाची ऑफर देखील दिली असून ती ऑफर त्यांनी अधिकृत पणे स्वीकारली आहे. त्यामुळे काँग्रेसने गोवा, मणिपूरचा बदला घेण्यासाठी कंबर कसली आहे.

हॅशटॅग्स

#Congress(494)#Rahul Gandhi(226)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x