13 August 2020 4:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
x

कर्नाटक निवडणुकीवर राष्ट्रवादीची प्रतिक्रिया

कर्नाटक निवडणुकीत भाजपला मिळालेले अविश्वसनीय यश हे प्रत्यक्ष राजकीय मैदानात चाललेल्या घडामोडींशी विसंगत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने कर्नाटकमध्ये काँग्रेसच्या उमेदवारांना आपले समर्थन दर्शवले आणि आपले उमेदवार दिले नाहीत. परंतु असे असून सुद्धा भाजपाला मिळालेल्या यशावर आमचा विश्वास बसत नाही, तरीही भविष्यात निवडणुका ह्या मतपत्रिके द्वारे घ्याव्यात असे ठाम मत राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले.

BhagyaVivah Marathi Matrimonial

महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या प्रतिक्रियेत असेही म्हटले आहे कि काँग्रेसची परिस्थिती हि कर्नाटकमध्ये चांगली होती आणि सिद्धरमैया सरकार विरोधात लोकांच्या मनात काहीच संभ्रम नव्हता. परंतु असे असतानाही लोकांच्या मनात काही वेगळं आणि निकाल काही वेगळा लागला. याउलट भाजप विरोधी वातावरण असताना आणि त्यांचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार येडियुरप्पा यांच्यावर भ्रष्ट्राचाराचे आरोप असताना देखील त्यांना मिळालेले यश हे विश्वास बसण्यासारखे नाही.

कर्नाटकात भाजपची राजकीय ताकद मर्यादित होती म्हणून हा परिणाम योग्यरित्या विश्लेषित केला गेला पाहिजे. तसेच ज्या ठिकाणी भाजपची काहीच ताकद नसताना त्यांना मिळालेला विजय हा इ.व्ही.एम. पद्धतीवर संभ्रम निर्माण करणारा आहे. तरीही लोकांच्या मनातील इ.व्ही.एम. बद्दलचा संभ्रम दूर करण्यासाठी निवडणूक आयोगाने यापुढील निवडणूका ह्या मतपत्रिकेद्वारे घ्याव्यात असे मत व्यक्त केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले की, भविष्यात भाजपला पराभूत करण्यासाठी सर्वच समविचारी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x