28 April 2024 12:52 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या Sandur Manganese Share Price | अशी संधी सोडू नका! अवघ्या 1 महिन्यात या शेअरने 43% परतावा दिला, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 28 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Mazagon Dock Share Price | सरकारी कंपनीचा शेअर तुफान तेजीत, 2 वर्षांत दिला 685% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स फोकसमध्ये, कंपनीबाबत मोठी अपडेट, फायदा होणार? HUDCO Share Price | PSU शेअर खरेदीला गर्दी, 1 वर्षात 369% परतावा दिला, तर 1 दिवसात 15% परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील आणि टाटा मोटर्स शेअर्समध्ये येणार सुसाट तेजी, कंपनीने दिली फायद्याची अपडेट
x

Loksabha Election 2024 | बिहारमध्ये लालू-नितीश जोडी भाजपचा करेक्ट कार्यक्रम करणार, INDIA समोर NDA चा टिकाव लागणार नाही

Loksabha Election 2024

Loksabha Election 2024 | लोकसभा निवडणूक 2024 च्या तयारीत सर्वच राजकीय पक्ष गुंतले आहेत. मुख्य लढत एनडीए आणि INDIA आघाडी यांच्यात होणार आहे. वेगवेगळ्या टीव्ही चॅनल्सचे सर्व्हेही येऊ लागले आहेत. बिहारमध्ये लोकसभेच्या एकूण ४० जागा आहेत. इंडिया टुडे सी व्होटरने बिहारच्या निवडणुकीचा मूड जाणून घेण्यासाठी एक सर्वेक्षण केले. ज्याची आकडेवारी अत्यंत धक्कादायक आहे. जिथे INDIA’चा मोठा फटका एनडीएला बसताना दिसत आहे. मात्र बिहारच्या स्थानिक माध्यमांनी आणि वरिष्ठ पत्रकारांनी दिलेल्या प्रत्यक्ष जमिनीवरील अंदाजानुसार NDA ला आगामी लोकसभा निवडणुकीत बिहारमधून केवळ ४ ते ५ जागा मिळतील असं म्हटलं आहे, जे इंडिया टुडे सी व्होटरपेक्षाही भीषण आहे.

एनडीए पेक्षा INDIA आघाडी भारी ठरणार

इंडिया टुडे-सी व्होटर सर्व्हेनुसार बिहारमधील लोकसभेच्या 40 जागांपैकी महाआघाडीला सर्वाधिक 26 जागा मिळतील. तर एनडीएला 14 जागा मिळू शकतात असा अंदाज आहे. बिहारमध्ये INDIA महाआघाडी एनडीएवर भारी दिसत आहे. जिथे एनडीएला केवळ १४ जागांवर समाधान मानावे लागेल. वेगवेगळ्या पक्षांबद्दल बोलायचे झाले तर राजद आणि जेडीयूला मिळून 22, एलजेपीला 3 आणि भाजपला 11 जागा मिळू शकतात. तर, या निवडणुकीत बिहारमध्ये काँग्रेसला चार जागा मिळताना दिसत आहेत. म्हणजेच एनडीएला एकूण 14 आणि ‘इंडिया’ आघाडीला 26 जागा मिळणार आहेत. मात्र बिहारच्या स्थानिक माध्यमांनी प्रत्यक्ष जमिनीवरील अंदाजानुसार NDA ला आगामी लोकसभा निवडणुकीत बिहारमधून केवळ ४ ते ५ जागा मिळतील असं म्हटलं आहे. त्यामुळे भाजपची चिंता प्रचंड वाढणार आहे.

इंडिया टुडे सी व्होटर पोल सर्व्हे

* राजद + जेडीयू – 22
* भाजप – 11
* काँग्रेस – 04
* एलजेपी-3

नितीश-लालूंचा दबदबा

2019 च्या लोकसभा निवडणुकीत जेडीयू, भाजप आणि लोजपा एकत्र लढले होते. नितीशकुमार तेव्हा एनडीएत होते. ऑगस्ट 2022 मध्ये त्यांनी एनडीएशी संबंध तोडले. आता ते बिहारमध्ये काँग्रेस, राजद आणि डाव्या पक्षांसोबत महाआघाडीचे सरकार चालवत आहेत. 2019 मध्ये बिहारमध्ये एनडीएने क्लीन स्वीप केले होते. 40 पैकी 39 जागा जिंकल्या. त्याला मूळ कारण नितीश कुमार सोबत असणं आणि CRPF शहीद जवानांच्या नावाने मोदींनी मागितलेली मतं हे मुख्य कारण होतं. मात्र यावेळी तसं चित्र नसून महागाई आणि बेरोजगारीची बिहारमध्ये आणि देशात मोदी सरकारची प्रतिमा ही ‘जुमलेबाज सरकार’ अशी झाली आहे असं स्थानिक वरिष्ठ पत्रकार सांगत आहेत.

Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Loksabha Election 2024 Bihar INDIA in strong position 27 August 2023.

हॅशटॅग्स

#Loksabha Election 2024(17)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x